Homeआरोग्यजिल्हाधिकारी प्रसाद यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहास भेट, 2027 मध्ये कारागृह स्थापनेची 100...

जिल्हाधिकारी प्रसाद यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहास भेट, 2027 मध्ये कारागृह स्थापनेची 100 वर्षे पूर्ण करणार

कारागृहातील सोईसुविधा समाधानकारक असून त्यात अधिक वाढ करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे जिल्हाधिकारी म्हणाले..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक मध्यवर्ती कारागृहाचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता, या कारागृहाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यसैनिक व थोर समाजसुधारक साने गुरुजी यांनी येथे कारावास भोगलेल्या बॅरकची पाहणी आज दि.18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहास भेट देऊन केली व साने गुरुजी यांच्या स्मृतींना यावेळी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कारागृहातील विविध विभागांची पाहणी यावेळी जिल्हाधिकार्यांनी जिल्हा कारागृह अधीक्षक अरूणा मुगुटवार यांच्या सोबत केली.
लवकरच नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृह 2027 मध्ये त्याच्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण करणार आहे. त्याच अनुषंगाने मध्यवर्ती कारागृह अधिक सक्षम, आधुनिक व आदर्श सुधारगृह म्हणून विकसित करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. सध्या कारागृहातील बंदीवानाना अधिक सुविधा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली. कारागृहातील व्यवस्था, सोईसुविधा समाधानकारक असून त्यात अधिक वाढ करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे जिल्हाधिकारी म्हणाले.
कारागृह प्रशासनाच्या कामकाजाचा दर्जा अधिकाधिक सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून नियमित आढावा घेण्यात येईल तसेच कैद्यांच्या सुधारणा व पुनर्वसनाच्या दृष्टीने शिक्षण, कौशल्यविकास, आरोग्य सुविधा, स्वच्छता, मानसिक समुपदेशन तसेच विविध सुधारात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून नाशिक मध्यवर्ती कारागृह देशातील आदर्श सुधारगृह म्हणून नावारूपास आणण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे ते पुढे म्हणाले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जबलपुर में मां की ममता ने आखिरी सांस तक बेटे को थामे रखा था...

0
जबलपुर ( रमाकांत मोरे ) में हुए दर्दनाक क्रूज़ हादसे की यह तस्वीर हर किसी की आंखें नम कर रही है। पानी में तैरती...

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

लोक अदालत में पारिवारिक मसलो से सम्बन्धित मामलो का निराकरण मध्यस्थता के माध्यम से...

0
बुरहानपुर .- वर्ष 2026 की द्वितीय लोकअदालत का आयोजन 9 मई 2026 वार शनिवार को कुटुंब न्यायलय (फॅमिली कोर्ट) बुरहानपुर में होना है l...

मध्यस्थतेतून कौटुंबिक वादांचा निकाल – प्रधान न्यायाधीश तनवीर अहमद खान

0
बुरहानपूर (नि.प्र.) : वर्ष 2026 मधील दुसरी राष्ट्रीय लोकअदालत येत्या 9 मे रोजी, शनिवार, कुटुंब न्यायालय (फॅमिली कोर्ट) बुरहानपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे....

error: Content is protected !!