Homeक्राईममहावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाच घेतांना अटक

महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाच घेतांना अटक

भुसावळ : सोलर सिस्टीम बसविण्यासाठी मंजुरी व रिलीज ऑर्डर देण्याच्या मोबदल्यात २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या भुसावळ शहर-१ कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अभिमन्यु पाटील (वय ४९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी, दि. २२ जुलै रोजी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे सोलर सिस्टीम बसविण्याची एजन्सी आहे. त्यांच्या माध्यमातून भुसावळ शहरातील दोन ग्राहकांनी सोलर सिस्टीम खरेदी केली होती. या दोन्ही ग्राहकांच्या सोलर सिस्टीम बसविण्यासाठी महावितरणकडून मंजुरी व रिलीज ऑर्डर मिळावी, यासाठी तक्रारदार यांनी ऑनलाइन अर्ज केले होते.

या प्रकरणांची तपासणी करून मंजुरी व रिलीज ऑर्डर देण्याचे काम अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अभिमन्यु पाटील यांच्याकडे होते. तक्रारदार हे बुधवारी त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी गेले असता, प्रत्येक प्रकरणासाठी १ हजार रुपये याप्रमाणे दोन प्रकरणांसाठी एकूण २ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव घटकाकडे तक्रार दिली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार नितीन पाटील यांनी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी नितीन अभिमन्यु पाटील यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू मराठे यांचा समावेश होता.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी भारत तांगडे, प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा कोणी लाच मागत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!