Homeसामाजिकभर पावसात भुसावळमध्ये उपवर्गीकरणाविरोधात ‘एल्गार’ विराट महामोर्चा

भर पावसात भुसावळमध्ये उपवर्गीकरणाविरोधात ‘एल्गार’ विराट महामोर्चा

अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये; विविध मागण्यांसाठी शासनाला निवेदन

भुसावळ – अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात भुसावळ शहरात बुधवार, दि. २२ जुलै रोजी ‘एल्गार महामोर्चा’ काढण्यात आला. भर पावसातही मोठ्या संख्येने आंदोलक या महामोर्चात सहभागी झाले. नाहाटा कॉलेजपासून सुरू झालेला हा मोर्चा प्रांत कार्यालयावर नेण्यात आला.

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती,भुसावळ तालुका व शहराच्या वतीने आयोजित या महामोर्चात विविध सामाजिक, राजकीय तसेच आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत शासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भर पावसातही आंदोलकांचा उत्साह आणि आंदोलनाची तीव्रता कायम राहिली.

उपवर्गीकरणाला विरोध; शासनाकडे विविध मागण्या

महामोर्चानंतर उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांना निवेदन देण्यात आले. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीचा विचार करता अनुसूचित जातींमध्ये परस्पर मागासलेपण सिद्ध करणारा आवश्यक अभ्यास किंवा आकडेवारी उपलब्ध नसल्याने उपवर्गीकरणाची आवश्यकता नाही, असा दावा निवेदनात करण्यात आला.

याशिवाय खासगी क्षेत्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करावे, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे प्रमाण वाढवावे, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, शिष्यवृत्ती व कल्याणकारी योजनांचा निधी वाढवावा आणि तो इतर योजनांकडे वळवू नये, अशा मागण्या करण्यात आल्या.

तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचा विविध शासकीय विभागांतील अनुशेष विशेष भरती मोहिमेद्वारे तातडीने भरावा, सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार व संविधानिक आरक्षणाच्या संधी अबाधित ठेवण्यासाठी सरसकट खासगीकरणाला प्रतिबंध घालावा, अशीही मागणी करण्यात आली.

हे निवेदन उपविभागीय अधिकारी अधिकारी जितेंद्र पाटील यांना देण्यात आले असून राज्यपाल, मुख्यमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री, मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकारी, जळगाव यांना माहितीस्तव पाठविण्यात आले आहे.

या महामोर्चाचे नेतृत्व राजू सूर्यवंशी, गणेश सपकाळे, बाळा पवार, जगन सोनवणे, शाताराम जाधव, बाळा मोरे, सुधीर जंजाळे, उन्हास पगारे, बाळा सोनवणे, सुमंगल अहिरे, रवींद्र, संदीप सावळे, ॲड. धनराज मगर, बाळू सोनवणे, वाल्मिक देहाडे, मुना सोनवणे आणि विजय सावळे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!