Homeक्राईमदिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून भगूर येथे केंद्र सरकारचा निषेध!

दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून भगूर येथे केंद्र सरकारचा निषेध!

भगूर येथील छ.शिवाजी महाराज चौक येथे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त..

पोलीस वार्ता, देवळाली | दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्र सरकार फक्त विद्यार्थी आत्महत्या, शिक्षणाचा खुला काळाबाजार, नीट पेपर फुटी यासर्व गोष्टींची काळजी न करता गप्प बसले आहे.

सरकारच्या या भूमितीचा निषेध करण्यासाठी देशभरामध्ये विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलने केली जात आहे. याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून भगूर येथे देखील विद्यार्थ्यांसोबत सामाजिक कार्यकर्त्यांनी छ.शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केंद्र सरकारच्या विरुद्ध निदर्शने आंदोलन केले. या आंदोलनाचा उद्देश म्हणजे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना आंदोलनातून जबरदस्तीने उचलून नेले तसेच अभिजीत दिपके व इतर सहकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. यासर्व गोष्टींचा निषेध आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र चव्हाण याचा राजीनामा ही जोरदार मागणी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून होत होती.

भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. कुस्तीपटू ॲड.गोरखनाथ बलकवडे, नेते केतन सोनवणे यांनी सक्रिय सहभाग घेऊन बीजेपी सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास हे आंदोलन आणखी उग्र करण्याचे संकेत दिले असून केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलकांशी चर्चा करून शिक्षण पद्धतीत सुधारणा करावी व योग्य असा शिक्षण मंत्री देशाला व राज्याला द्यावा अशा भावना बोलून व्यक्त केल्या आहे.

सामाजिक कार्यकर्ते वीर सोनवणे, संतोष भालेराव, सागर साळवे, बाळू साळवे, भारत वाघमारे (सत्यशोधन आघाडी) यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. आंदोलनात शिवाजी साळवे, कुणाल गायकवाड, नितेश पात्रे, अजिंक्य भवार, सुयोग आडके, मोईन शेख, वसीमभाई मन्सूरी, तुषार भवार, राहुल साळवे, अनिकेत भवार, संकेत पगारे, मंगेश यादव, अलतमश शेख, प्रफुल्ल सोनवणे आदींनी सहभाग घेतला होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

कराड उत्तरमध्ये महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

0
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी...

अगस्त क्रांति दिवस

0
रमाकांत मोरे । अगस्त माह भारत के स्वतंत्रता इतिहास में एक विशेष महत्व रखता है। 9 अगस्त 1925 को उत्तरप्रदेश के प्रमुख शहर लखनऊ...

गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में विशेष गोष्ठी सफलतापूर्वक संपन्न

0
​बुरहानपुर | परम वंदनीय माता जी एवं अखण्ड दीप के शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा एक विशेष गोष्ठी का आयोजन...

error: Content is protected !!