नगरपरिषदेच्या 6 जागांसाठी आज शनिवार, 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 ते सायं. 5:30 या वेळेत मतदानाची प्रक्रिया होणार..
पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर, ओझर, चांदवड यांच्या नगरपरिषदेच्या 6 जागांसाठी आज शनिवार, 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 ते सायं. 5:30 या वेळेत मतदानाची प्रक्रिया होणार आहे. सिन्नर (2-अ, 4-अ, 10-ब), ओझर (1-अ व 8-ब) आणि चांदवड नगरपरिषदेच्या (3-अ) अशा सहा जागांसाठी मतदान पार पडेल, संबंधित मतदारसंघातील मतदार अधिकारी, कर्मचारी, कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत.
सदरचा आदेश आणि त्याची सवलत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणाऱ्या आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहील. त्यात राज्य, केंद्र शासन व खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल, रिटेलर्स आदींना हे नियम लागू राहतील.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...