Homeउद्योगकुंभमेळा प्राधिकरणाचा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 4500 बसेसने भाविकांच्या प्रवासाचे नियोजन!

कुंभमेळा प्राधिकरणाचा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 4500 बसेसने भाविकांच्या प्रवासाचे नियोजन!

पोलीस वार्ता, नाशिक | सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखों भाविकांच्या सोई-सुविधांसाठी तसेच त्यांचा प्रवास सुरक्षित, नियोजनबद्ध आणि सुलभ व्हावा, यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून व्यापक सार्वजनिक वाहतूक आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत एकूण 4500 बसेसची व्यवस्था करण्यात येणार असून, दररोज 33 लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक करण्याची क्षमता या वेळी शक्य होणार आहेत.
या नियोजनात रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळ ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत 3000 बसेसची विशेष सेवा उपलब्ध असेल. तसेच रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे स्थानकांपासून पुढील प्रवासासाठी स्वतंत्र 1500 बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. या एकात्मिक वाहतूक व्यवस्थेमुळे मुख्य धार्मिक परिसरात खासगी वाहनांचा ताण कमी होऊन भाविकांना सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या वाहतूक आराखड्यात बाह्य वाहनतळ, अंतर्गत प्रवासी उतरविण्याची ठिकाणे आणि रामकुंड तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पायी मार्ग व्यवस्था अशा तीन स्तरांवर नियोजन करण्यात आले आहे. अमृत स्नानासारख्या गर्दीच्या दिवसांमध्ये वाहतूक कोंडी टाळणे आणि भाविकांचा शेवटच्या टप्प्यातील प्रवास सुरळीत करणे, हा या व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे. रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी 46 बाह्य वाहनतळांपासून विशेष बस सेवा चालविण्यात येईल. यामध्ये नाशिकमधील बाह्य वाहनतळ ते अंतर्गत ठिकाणांसाठी 900 बस, नाशिकमधील वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर मार्गासाठी 1485 बस, तर त्र्यंबकेश्वरमधील अंतर्गत वाहतुकीसाठी 325 बस उपलब्ध असतील. गर्दीच्या काळातील अतिरिक्त गरज लक्षात घेऊन 290 बस राखीव ठेवण्यात येणार आहेत.
या व्यवस्थेद्वारे 24 तासांत सुमारे 407 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, दररोज सुमारे 25.36 लाख भाविकांची वाहतूक करण्याची क्षमता उपलब्ध होणार आहे. रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच रेल्वे स्थानकांना बस सेवेशी जोडण्यात येणार आहे. यासाठी 1500 बसचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी 520 बस रेल्वे स्थानक ते अंतर्गत वाहनतळ आणि 680 बस रेल्वे स्थानक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर धावतील. तसेच 300 बस राखीव ठेवण्यात येतील. या व्यवस्थेतून दररोज सुमारे 8.26 लाख रेल्वे प्रवाशांची वाहतूक करता येणार आहे.
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “कुंभमेळ्यासाठी अनेक भाविक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येतात. त्यांच्या प्रवासातील शेवटचे काही किलोमीटर सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध व्हावेत, यावर आमचा भर आहे. मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन आणि भाविकांची सुविधा लक्षात घेऊन ही विशेष बस व्यवस्था तयार करण्यात आली आहे.” महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी सांगितले की, अमृत स्नानाच्या दिवशी सर्वाधिक वर्दळ अपेक्षित असलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे नियोजनाशी समन्वय साधून वाहतूक व्यवस्था राबविण्यात येणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा वाहतूक नियोजन
  • रस्ते मार्गावरील व्यवस्था

• 500 बस : नाशिक बाह्य वाहनतळ ते अंतर्गत भाग
• 1485 बस : नाशिक वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर
• 325 बस : त्र्यंबकेश्वर अंतर्गत वाहतूक
• 290 बस राखीव
• क्षमता : दररोज 25.36 लाख प्रवासी
रेल्वे प्रवाशांसाठी व्यवस्था
• 520 बस : रेल्वे स्थानक ते अंतर्गत वाहनतळ
• 680 बस : रेल्वे स्थानक ते त्र्यंबकेश्वर
• 300 बस राखीव
• क्षमता : दररोज 8.26 लाख प्रवासी
अमृत स्नान नियोजन
• खासगी वाहनांना बाह्य वाहनतळापर्यंत प्रवेश
• पुढील प्रवासासाठी विशेष बस सेवा
• रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पायी मार्गांना प्राधान्य
तंत्रज्ञान आधारित नियंत्रण
• बसवर उपग्रहाद्वारे देखरेख
• एकात्मिक नियंत्रण कक्षातून नि
योजन
• गर्दीनुसार फेऱ्यांचे व्यवस्थापन
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!