मंत्री महाजन यांना बालिकेच्या कुटूंबीय आणि ग्रामस्थांनी आरोपीस कठोर शिक्षा देण्याची व पिडीत कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली..
पोलीस वार्ता, मालेगाव : तालुक्यात डोंगराळे येथे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घुण खुन केल्याची घटना घडली आहे. ही घटना धक्कादायक असून मंत्री महाजन यांनी दि.20 नोव्हेंबर 2025 रोजी पिडीत कुटुंबीयांची भेट घेऊन शासन त्यांच्या दु:खात त्यांच्या पाठीशी आहे. असे सांगितले तसेच आरोपीस कठोरात-कठोर शिक्षा होण्यासाठी कारवाई करून सदर खटला जलद न्यायालयात चालवण्यात येईल. त्यासाठी चांगला वकील पिडीत कुटुंबीयांना देण्यात येईल. तसेच आवश्यक ती मदत व पाठपुरावा करण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी पिडीत कुटूबियांचे सांत्वनपर भेटीत दिले आहे.
मंत्री महाजन यांना बालिकेच्या कुटूंबीय आणि ग्रामस्थांनी आरोपीस कठोर शिक्षा देण्याची व पिडीत कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. मंत्री महाजन यांनी संवादात पिडीत कुटूंबाचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी पोलिस उपअधीक्षक यशवंत बाविस्कर, तहसीलदार विशाल सोनवणे, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी आदी उपस्थित होते.
यापूर्वी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील पीडित कुटुबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत कुटूबियांना धीर दिला व शासन कुटूबियांच्यासोबत असल्याचे सांगितले होते.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...