भोर (संतोष मोहिते भोर) तालुक्यातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. National Highways Authority of India (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) व Maharashtra Highway Police (महाराष्ट्र महामार्ग पोलीस) यांच्या संयुक्त विद्यमाने National Highway 48 (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८) वर गॅन्ट्री व कॅन्टिलिव्हर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने या कामासाठी दोन ठिकाणी वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील सारोळा नदीजवळ सातारा जाणारा मार्ग पूर्णपणे बंद राहील. तसेच दि. ५ मार्च २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत वर्वे येथे पुणे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत पर्यायी व आपत्कालीन वाहतुकीसाठी सर्व्हिस रोडचा वापर करण्यात येईल. वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सर्व्हिस रोडचा वापर करावा व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही उपाय योजना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व नागरिकांनी सतर्क रहावे हे निवेदन जनतेसाठी करण्यात येत असून होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे.




































