जामनेर (प्रतिनिधी) : संत निरंकारी मंडल दिल्ली केंद्राच्या आदेशानुसार “मिशन अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन” या अभियानांतर्गत जामनेर ब्रांच सेवादल युनिट क्रमांक 1359 तर्फे रविवारी (दि. 22 फेब्रुवारी 2026) सोनबर्डी येथील जामनेर शहर पाणीपुरवठा जलकुंभ परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपेने व परम आदरणीय सुशीलजी दारा (क्षेत्रीय संचालक) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. सेवादलाच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत परिसरातील कचरा, प्लास्टिक व घाण साफ करून स्वच्छतेचा संदेश दिला.
या अभियानाचा उद्देश केवळ परिसर स्वच्छ ठेवणे नसून “स्वच्छ जल, स्वच्छ मन” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा होता. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी रतनसिंग परदेशी (सेवादल संचालक), प्रवीणजी शिंदे, देविदासजी पाटील, रविंद्र शिंदे, शंकर माळी, आबाजी पाटील यांच्यासह सेवादलाचे अनेक बंधू-भगिनी उपस्थित होते.




































