वणी पोलीस ठाण्यात दाखल असलेले घरफोडीचे दोन व चोरीचा एक गुन्हा कारवाईत उघडकीस आला आहे..

पोलीस वार्ता, वणी (यवतमाळ) | शहर परिसरातील वणी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपी जेरबंद करण्याच्या सूचना पोनि.भानुदास पिदुरकर यांनी शहर पोलीस गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने शहर पोलीस गुन्हे शोध पथकाने गोपनिय माहिती व शहरात सतत गस्त घालून खात्रीशीर माहिती मिळवली की, वणी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्यात पाहिजे असलेले संशयित आरोपी 1) सुमित राजु मानकर (वय-22 वर्ष) रा. रंगनाथनगर, वणी, यवतमाळ 2) राहुल उर्फ टिकल्या निलकंठ ठेंगणे (वय-32 वर्ष) रा. रंगनाथनगर, वणी, यवतमाळ हे असून ते सदर ठिकाणी आहेत. गुन्हे शोध पथकाने संशयितांना शिताफिने दि.10 जुलै 2026 रोजी ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली त्यावेळी त्यांनी अखेर गुन्हा केल्याची कबुली दिली.

यामुळे वणी पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गु.र.नं – 559/2026 भा.न्या.संहिता कलम 305 (अ), 331 (1) बी.एन.एस. हा घरफोडीचा गुन्हा आणि दुसरा गु.र.नं – 570/2026 भा.न्या.संहिता कलम 331(1), 305(अ), 62 बी.एन.एस. हा घरफोडीचा प्रयत्न असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आणखी दुसऱ्या एक प्रकरणामध्ये दोन महिला व एक पुरुष असे आरोपी 1)विजय देवानंद मेश्राम (वय-32 वर्ष) रा. नविन लालगुडा, वणी, यवतमाळ यास ताब्यात घेवुन बॅटरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या गुन्ह्यात आरोपींकडून रोख रक्कम व दोन मोठ्या बँटरी असा एकुण रक्कम 20,900/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.




































