मांज्यामुळे वन्यप्राणी, पक्षी व मानवी जीवीतास धोका निर्माण होवून त्याच्यामुळे जखमी होण्याचे व प्राण गमविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे..
पोलीस वार्ता, नाशिक : येत्या 2026 या नववर्षाच्या जानेवारी महिन्यातील संक्राती सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात डिसेंबर व जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात आकाशात पतंग उडविले जातात. या पंतग उडविण्यासाठी वापरात येणार मांजा (दोरा) हा नायलॉन असल्याचे निदर्शनास आले असून अशा मांज्यामुळे वन्यप्राणी, पक्षी व मानवी जीवीतास धोका निर्माण होवून त्याच्यामुळे जखमी होण्याचे व प्राण गमविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस शहरात वाढत चालले आहे. तसेच नायलॉन मांजामुळे विजेच्या तारांचे परस्पर घर्षण होवून विद्युत प्रवाह खंडीत होणे, आग लागणे अशा घटनाही घडताना दिसतात. यासाठी प्रतिबंध म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1) (अ) अन्वये नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याप्रकारच्या ज्या मांजांना काचेची कोटींग आहे अशा टोकदार व धारदार चायनीज मांज्यांची निर्मिती, विक्री, साठा आणि वापर यावर प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केले आहेत.
हा आदेश म्हणजे कोणी व्यक्ती शस्त्रे, तलवारी, भाले, दांडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा या प्रकारच्या शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा पद्धतीचा नायलॉन मांजा बाळगेल, वापर करेल अशा व्यक्तींवर देखील लागू असेल. सदर आदेश दि.20 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते 3 जानेवारी 2026 पावेतो अंमलात राहील. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्यास संहिता 2023 या कायद्याचे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र असेल असे प्रसिद्ध केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं
विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित
बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...