Homeआरोग्यसिंहस्थ कुंभमेळा स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक

सिंहस्थ कुंभमेळा स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक

2 हजार वृक्षांचे रोपण विविध ठिकाणी होणार आहे. अशा 15 ते 20 फुटांची 15 हजार वृक्षांचे रोपण टप्प्याटप्प्यातून करण्यात उपलब्ध झालेल्या जागेत करण्यात येणार..

पोलीस वार्ता, नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर येथे सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी हरित कुंभच्या शुभारंभातून वृक्षारोपण व विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा दि.15 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाला. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकची महती जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे. नाशिक हे पौराणिक काळापासून सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. नाशिकचा हा वारसा जपण्यास आगामी काळात स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व हरित कुंभमेळासाठी सर्वांचेच योगदान आवश्यक आहे, असे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी म्हटले आहे.
मंत्री महाजन म्हणाले की, आज हरित कुंभचा शुभारंभ झाला असून जवळपास 2 हजार वृक्षांचे रोपण विविध ठिकाणी होणार आहे. अशा 15 ते 20 फुटांची 15 हजार वृक्षांचे रोपण टप्प्याटप्प्यातून करण्यात उपलब्ध झालेल्या जागेत करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षातच ही झाडांना वटवृक्षासारखे स्वरूप येणार असून या कार्यात प्रशासनासह अनेक संस्थाही सहभागी झाल्या आहेत. नाशिक शहराची ओळख आपण सर्वांना जपायची असून वृक्ष वाचली पाहिजेत, वृक्ष संवर्धन झाले पाहिजे या भूमिकेतून नागरिकांचेही भरीव योगदान अपेक्षित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गोदावरी नदीचे पाणी पवित्र करण्याचा संकल्प सर्व नाशिककरांच्या साक्षीने घेतला आहे. जवळपास 1500 कोटींच्या मलनि:सारण प्रकल्पाच्या माध्यमातून जल शुद्ध करून गोदावरीत प्रवाहित केले जाणार आहे. येत्या वर्षभरातच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर शहरालाही तितकेच धार्मिक महत्व असून या ठिकाणीही 250 कोटींच्या योजनेतून बाराही महिने पाणी उपलब्ध राहील असे नियोजन करण्यात आले आहे. सिंहस्थ कुंभमेळादृष्टीने साकारण्यात येत असलेल्या रिंगरोडमुळे उद्योगांना चालना मिळणार असून औद्योगिकदृष्ट्या नाशिकचा अधिक विकास होणार आहे. शहरातही 700 कोटी निधीतून रस्त्यांची कामे सुरू झाली असून कायमस्वरूपी व्हाइट टॉपिंग सिमेंट रस्ते तयार होणार आहेत. रामकालपथ साकारण्यासाठी विस्थापित करण्यात आलेल्या व्यावसायिकांना पर्यायी जागा व मोबदला देण्यात आलेला आहे. तसेच 63 नागरिकांना पर्यायी निवास प्रशासानाने उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे केवळ नागरिकांच्या सहकार्याच्या भूमिकेतून कुंभमेळा यशस्वी होणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. याप्रसंगी मंत्री महाजन यांच्या हस्ते प्राधिनिधिक स्वरूपात सदनिका वाटप पत्र प्रदान करण्यात आहे. तसेच आमदार राहुल ढिकले व आमदार देवयानी फरांदे यांनीही थोडक्यात त्यांचे मनोगत व्यक्त केले.

कामांचे भूमीपूजन संपन्न 

1. अमृत 2.0 योजनेंतर्गत मलनि:सारण व्यवस्था विकासित करणे- प्रकल्पाची किंमत रू 227 कोटी
2. नाशिक म्युनिसिपल बाँड अंतर्गत मलनि:सारण व्यवस्था विकसित करणे- प्रकल्पाची किंमत रू.225 कोटी
3. कुंभमेळासाठी नाशिक शहरातील 7 रस्ते व 2 पूल विकसित करणे- प्रकल्पाची किंमत रू. 237.66 कोटी
4. हरित कुंभचा शुभारंभ, 15 हजार वृक्षारोपणाचा प्रारंभ

या कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महंत भक्तीचरणदास महाराज, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!