आज 15 डिसेंबर 2025 पासून निवडणूकांची घोषणा जाहीर होताच, आचार संहिता लागू करण्यात आली आहे..

पोलीस वार्ता, मुंबई : राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद आज मुंबईत संपन्न झाली यावेळी राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रात दोन-तीन वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
राज्यातील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. 39 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 29 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज 15 डिसेंबर 2025 पासून निवडणूकांची घोषणा जाहीर होताच, आचार संहिता लागू करण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी निवडणूक प्रचार 48 तासांपूर्वी थांबवावा लागणार आहे. तर उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल प्रक्रिया 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत सुरु असणार आहे.

29 महानगरपालिका निवडणूक
-
उमेदवारी अर्ज स्वीकारणे :- 23 ते 30/12/2025
-
उमेदवारी अर्जची छाननी :- 31/12/2025
-
उमेदवारी अर्ज माघार घेणे :- 02/01/2026
-
निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारी यादी जाहीर :- 03/01/2026
-
मतदान :- 15/01/2026
-
निकाल :- 16/01/2026































