Homeताज्या बातम्याभारत निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यात मतदार यादींचे विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम!

भारत निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यात मतदार यादींचे विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम!

मतदारांना स्वत:ची माहिती अद्ययावत करण्याची तसेच नवीन छायाचित्र उपलब्ध करून देण्याची सुविधा असणार आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : भारत निवडणूक आयोगाने भारतीय संविधानातील कलम 324 अंतर्गत 24 जून 2025 रोजी देशभरातील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revisin) करण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील 51 लाख 28 हजार मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून ही प्रकिया जून ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे.
वाढते शहरीकरण, स्थलांतर तसेच मतदार याद्यांमधील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे किंवा चुकीच्या नोंदी यामुळे मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील 4 हजार 919 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेट देवून पूर्ण भरलेले गणना पत्रक मतदारांना वितरीत करतील. भरलेले अर्ज पुन्हा संकलित करतील. या पत्रात मतदाराची सध्याची माहिती तसेच उपलब्ध असल्यास 2002-04 मधील विशेष पुनरिक्षणातील जुनी नोंद समाविष्ट असेल. मतदारांना आवश्यक असल्यास स्वत:ची माहिती अद्ययावत करण्याची तसेच नवीन छायाचित्र उपलबध करून देण्याची सुविधा असणार आहे.

मतदारांना स्वतःची अथवा कुटुंबातील सदस्यांची माहिती पडताळून पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर सुविधा उपलब्ध आहे. तसेच आवश्यक माहिती व मार्गदर्शनासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे. घरभेटीदरम्यान संबंधित कुटुंबीय घरी उपलब्ध नसल्यास मतदार केंद्रस्तरीय अधिकारी किमान 3 वेळा भेट देणार आहेत. तरीही संपर्क होऊ न शकल्यास गणना प्रपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध राहणार असून, त्याबाबतची सूचना संबंधित मतदारांना देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात राबविण्यात येणारी मोहिम
1. मतदारांच्या घरी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी भेट देवून गणना अर्ज वाटप करणे व भरलेले अर्ज परत घेणे- 30 जून ते 29 जुलै 2026
2. प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी- 5 ऑगस्ट 2026
3. प्रारूप यादीवर दावे व हरकती नोंदविणे- 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026
4. दावे व हरकती निकाली काढणे- 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत
5. अंतिम मतदार यादींची प्रसिद्धी – 7 ऑक्टोबर 2026
मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्यासाठी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. सर्व नागरिकांनी मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून अचूक व त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करण्यासाठी शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि प्रसाद यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!