बोलताना उत्तमराव जाधव म्हणाले की, स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या भूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादाई आहे..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर येथील स्वातंत्र्य वीर सावरकर जयंती उत्सव समितीचे आधारस्तंभ उत्तमराव जाधव यांची भडगाव, जळगाव येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती झाली त्याबद्दल समितीच्या वतीने आनंदवन मिसळ येथे त्यांचा छोट्या खाणी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या सत्कार प्रसंगी बोलताना उत्तमराव जाधव म्हणाले की, स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या भूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादाई आहे. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात समिधा अर्पण करून भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या पावन भूमीत माझा सत्कार झाला, हे माझे परम भाग्य समजतो, तसेच हा सत्कार माझ्या काळजात जपून ठेवील असे प्रतिपादन भडगाव, जळगाव येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांनी केले आहे.



























