महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व तत्सम आस्थापन अशा सर्वांना ही सार्वजनिक सुट्टी लागू..
पोलीस वार्ता, मुंबई : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील 29 महानगरपालिका क्षेत्रात दि.15 जानेवारी 2026, गुरुवार रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात मतदान दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंबंधी आदेश व सूचना राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे.
सदर सूचना सर्व शासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील कार्यालये तसेच निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांना, महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व तत्सम आस्थापन अशा सर्वांना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तसेच लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांनी मतदानासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.
सुट्टी जाहीर महानगरपालिका क्षेत्र
बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...