Homeउद्योगशहरातील सातपूर व गंगापूर हद्दीत दहा घरफोडी करणारा सराईत गुन्हेशाखा युनिट-1 च्या...

शहरातील सातपूर व गंगापूर हद्दीत दहा घरफोडी करणारा सराईत गुन्हेशाखा युनिट-1 च्या ताब्यात!

चोरीचे एकूण 137.35 ग्रॅम वजनाचे 15,10,850/- रुपये किंमतीचे सोने मुद्देमाल जप्त करुन शहरातील घरफोडीचे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच विविध गुन्ह्यातील फरार चोर, गुन्हेगारांचा तपास करणे व अवैध रित्या शस्त्र बाळगणाऱ्या सराईतांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा व संबंधित पोलीस ठाण्याना दिले आहेत.

त्यानुसार शहरात तपास करत असताना नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकातील पोह. विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे यांना दि.1 जानेवारी 2026 रोजी गुप्त बातमी मिळाली की, गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी हा शहरातील धृवनगर भागात, संशयीत रित्या फिरत आहे. बातमीची खात्री करून ही माहिती शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे वपोनि डॉ.अंचल मुदगल यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोउपनि. चेतन श्रीवंत, पोह. प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, पोअं. अमोल कोष्टी, मुक्तार शेख, राहुल पालखेडे यांचे पोलीस पथक तयार करून माहितीच्या आधारे धृवनगर परिसरात जाऊन पथकाकडून सापळा लावण्यात आला.

काही वेळातच संशयित दिसून येताच पथकाने त्याला ताब्यात घेऊन नाव विचारले असता, त्याने नाव प्रदिप जगन्नाथ तुपे (वय-35), रा- मु.पो. जेकेनवाडी, ता.खानापुर, जि.सांगली असे सांगितले. त्यास पोलीस पथकाने विश्वासात घेऊन नमूद गुन्ह्याबद्दल विचारले असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याला आणखी विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितले की, साथीदारांसह नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाणे ह‌द्दीत 4 व गंगापुर पोलीस ठाणे ह‌द्दीत 6 असे एकुण 10 घरफोडीचे गुन्हे त्याने केले आहेत. त्याने चोरी केलेले सोने एका सराफास विकल्याचे देखील सांगितले. त्यानुसार गुन्ह्यातील चोरीचे एकूण 137.35 ग्रॅम वजनाचे 15,10,850/- रुपये किंमतीचे सोने मुद्देमाल जप्त करुन शहरातील घरफोडीचे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात श्रेणी पोउनि. किरण शिरसाठ, मिलीदसिंग परदेशी, शेरखान पठाण, योगिराज गायकवाड, देविदास ठाकरे, उत्तम पवार, धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, गोरक्ष साबळे, जगेश्वर बोरसे, चालक पोअं. समाधान पवार, मपोअं. अनुजा येलवे, शर्मिला कोकणी, मनिषा सरोदे यांचा देखील समावेश होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!