Homeउद्योगभगूर नगरपरिषदेच्या विकासकामाचे आमदार सरोज अहिरे व नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या हस्ते...

भगूर नगरपरिषदेच्या विकासकामाचे आमदार सरोज अहिरे व नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या हस्ते भूमिपूजन!

उद्यान येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा मानस असून काम उत्तम दर्जाचे करण्यासाठी पुण्यातील एजन्सीला काम देण्यात आले आहे..

पोलीस वार्ता, देवळाली : भगूर येथे ‘नमो उद्यान’ कामाचे भूमिपूजन शुक्रवारी दि.20 मार्च रोजी करण्यात आले. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे व भगूर नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्यासह स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते दिवंगत मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतीमेस अभिवादन करून उद्याच्या कामाला कुदळ मारून भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.
‘नमो उद्यान’ उभारण्यासाठी एक कोटी साठ लाख रुपये खर्च येणार आहे. तसेच सव्वा एकर जागेवर हे उद्यान साकारण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.प्रेरणा बलकवडे यांनी यावेळी दिली. हे उद्यान येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा मानस असून काम उत्तम दर्जाचे करण्यासाठी पुण्यातील एजन्सीला काम देण्यात आले आहे.

हे काम सर्व स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन पूर्ण करण्याचे तसेच लवकरच भगूरच्या जनतेसाठी आगामी एसटिपी प्लान, बौद्ध विहार, गावातील अंतर्गत रस्ते, स्वातंत्र्य वीर सावरकर उद्यान आणि स्वा.वीर सावरकर यांच्या नावे कमान उभारणी अश्या अनेक विकासकामांची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी भगुर नगरपरिषदचे मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हैसधुने, भगूर मा.नगराध्यक्ष गोरख(नाना) बलकवडे, रा.काँ. नेते मस्के, दादासाहेब देशमुख, सेवानिवृत्त डि.वाय.एस.पी रमेश पवार, जेष्ठ नेते शिवाजी करंजकर, कृ.उ.बा. समिती संचालक तानाजी आबा करंजकर, भगुर नगरपरिषद उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, नगरसेवक विशाल बलकवडे, दिपक बलकवडे, पवार, नगरसेविका सौ.विद्या ताई, लता थापेकर, जयश्री शिरसाट, अश्विनी भवार, मृत्यूंजय कापसे, रा.काँ. नेते अरुण कुंवर, श्रीराम कातकाडे, बांधकाम सभापती काकासाहेब देशमुख, सौ.जयश्री देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
भगूर गावातील रहिवाशी व प्रतिष्ठित अनेक नागरिक अंबादास आडके, पंकज शेलार, मा.नगरसेवक बापु शेटे, बाळासाहेब कासार, नंदकिशोर गायकवाड, राजेंद्र शाह, दिगंबर ससाणे, मा.नगरसेवक किशोर कुंडारीया, संदिप कुंडारीया, केतन सोनवणे, तेजस गवारे, अंबादास देशमुख, लोया, निलेश हासे, फिटर मोजाड, प्रशांत कापसे यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. शेवटी आलेल्या सर्व मान्यवरांचे नगरसेवक दिपक बलकवडे यांनी आभार मानले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80...

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

error: Content is protected !!