रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती..
पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे हद्दीतील खेडशिवापूर गाव परिसरातील एकदंत अपार्टमेंटच्या खुल्या पार्किंगमधून एक बजाज कंपनीची काळ्या-पिवळ्या रंगाची रिक्षा चोरीला गेल्याची घटना मंगळवारी समोर आली. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आश्पाक महंमद इनामदार, वय-50 वर्षे, रा. खेडशिवापूर, ता.हवेली, जि.पुणे हे रिक्षा चालक व मालक यांनी त्यांची रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या खुल्या पार्किंगमध्ये उभी केली होती. तेव्हा पासून ते दि.11 ऑगस्ट सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने रिक्षा चोरून नेल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.
त्यानुसार राजगड पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीचा BNS कलम 303(2) अंतर्गत, गु.र.क्र- 295/2026 हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या रिक्षाची अंदाजे किंमत 70 हजार रुपये असून चोरीचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पो.ह. प्रधान हे करीत आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरात तपास सुरू आहे.
रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती..
पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35...
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...