Homeआरोग्यभुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त

भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय अर्हता नसताना वैद्यकीय व्यवसाय केल्याचा आरोप करीत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.१०) कारवाई केली. या कारवाईत डॉ. उमेश मधुकर सपकाळे (वय ५१, रा. तुकारामनगर, कान्हाळा रोड, भुसावळ) यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट १९६१ मधील कलम ३३(१) व ३३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी तालुका आरोग्य केंद्र, नगरपालिका भुसावळ येथील डॉ.पठाण तौसीफ खान फिरोज खान (वय ४१) यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जनसेवा क्लिनिकमध्ये बोगस डॉक्टरकडून वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी पंच व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई करण्याचे नियोजन केले.

रिसेप्शनिस्टकडून क्लिनिकची माहिती…

पोलिस पथकाने सायंकाळी सुमारे ५.०६ वाजता कारवाईसाठी क्लिनिककडे रवाना झाले. क्लिनिकमध्ये सोनाली ललित चौधरी (वय ३०, रा. श्रद्धानगर, ऑईल मिलजवळ, भुसावळ) ही महिला रिसेप्शनिस्ट म्हणून काम करताना आढळली. तिने सदर क्लिनिक डॉ. उमेश सपकाळे यांचे असून ते काही वेळात येणार असल्याचे सांगितले.

काही वेळाने डॉ. उमेश मधुकर सपकाळे क्लिनिकमध्ये आले. पंचांसमक्ष चौकशी केली असता त्यांनी सदर क्लिनिक आपणच चालवत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कारवाईचा उद्देश समजावून सांगून क्लिनिकची पाहणी केली.

वैद्यकीय प्रमाणपत्रांची चौकशी…

क्लिनिकच्या भिंतीवर कोणतेही वैद्यकीय पदवी अथवा नोंदणी प्रमाणपत्र लावलेले आढळले नाही. पोलिसांनी वैद्यकीय अर्हतेबाबत विचारणा केली असता सपकाळे यांनी काही प्रमाणपत्रांची छायाचित्रे दाखविल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामध्ये ‘Bachelor of Electropathy Medicine and Surgery (BEMS)’, ‘Electro Homoepathic System of Medicine’ तसेच ‘HR Electro Homoepathy Medical Council, Hathin’ यांच्याशी संबंधित प्रमाणपत्रांचा समावेश होता.

पोलिसांनी ही प्रमाणपत्रे पंचांसमक्ष ताब्यात घेऊन त्यावर पंच, वैद्यकीय अधिकारी व पोलिसांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.

विविध इंजेक्शन्स व वैद्यकीय साहित्य जप्त…

क्लिनिकमधील तपासणी टेबल व इतर ठिकाणी विविध औषधे व इंजेक्शन्स आढळून आली. त्यामध्ये व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स इंजेक्शन, डायक्लोफेनाक सोडियम इंजेक्शन, डेक्सामेथासोन इंजेक्शन, जेंटामायसिन इंजेक्शन, क्लोरोक्वीन फॉस्फेट इंजेक्शन, मिडाझोलम इंजेक्शन, एनएस १०० एमएल, सिरिंज, आयव्ही कॅन्युला, सर्जिकल स्यूचर आदी साहित्याचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. काही औषधे अर्धवट वापरलेली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

यातील काही औषधांची एक्सपायरी जून २०२६ अशी असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. पुढील तपासणीसाठी हा औषधसाठा बॉक्समध्ये ठेवून पंच, वैद्यकीय अधिकारी व पोलिसांच्या स्वाक्षरीचे लेबल लावण्यात आले. त्यानंतर संपूर्ण औषधसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला.

वैद्यकीय नोंदणी नसल्याचा पोलिसांचा दावा…

डॉ. सपकाळे यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र नसल्याची खात्री झाल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. कोणतीही वैद्यकीय अर्हता नसताना रुग्णांची तपासणी करून औषधे देत असल्यास त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोपही करण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान डॉ. उमेश सपकाळे यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. ही कारवाई १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.४५ ते रात्री ८.१५ या कालावधीत करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट १९६१ चे कलम ३३(१) व ३३(२) अन्वये कारवाई करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

कराड उत्तरमध्ये महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

0
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी...

अगस्त क्रांति दिवस

0
रमाकांत मोरे । अगस्त माह भारत के स्वतंत्रता इतिहास में एक विशेष महत्व रखता है। 9 अगस्त 1925 को उत्तरप्रदेश के प्रमुख शहर लखनऊ...

गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में विशेष गोष्ठी सफलतापूर्वक संपन्न

0
​बुरहानपुर | परम वंदनीय माता जी एवं अखण्ड दीप के शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा एक विशेष गोष्ठी का आयोजन...

फैजपूर-सावदा शहरातील बेशिस्त रिक्षा चालक आणि दुकानांच्या अतिक्रमनावर प्रशासनाची कारवाई कधी?

रस्त्यात रिक्षा वाहने लावून अडथळा निर्माण करणे सर्रास नजरेत पडते, दुकानदारांनी देखील या ठिकाणी अतिक्रमण केल्याचे दिसते.. पोलीस वार्ता, भुसावळ | रावेर तालुक्यातील फैजपूर-सावदा शहरातील...

error: Content is protected !!