भोर (प्रतिनिधी संतोष मोहिते):मुळशी तालुक्यातील सुतारवाडी येथे पै. ह. भ. प. मोहन आप्पा वणवे (संस्थापक अध्यक्ष, विठ्ठल-रुक्मिणी सेवा प्रतिष्ठान) यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नातून साकारलेल्या भव्य ‘तीर्थक्षेत्र भक्तीधाम’ मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना व अनावरण सोहळा रविवार , दिनांक २२ मार्च २०२६ रोजी संपन्न होणार आहे. या नयनरम्य मंदिरामुळे मुळशीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
एकाच छताखाली अनेक देवतांचे दर्शन
या भक्तीधामाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भाविकांना विविध देवी-देवतांच्या मूर्तींचे दर्शन एकाच ठिकाणी घेता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने: श्री विठ्ठल-रुक्मिणी साईबाबा, दत्तात्रय महाराज, स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज, शंकर बाबा,श्री गणेश श्री शंकर-पार्वती संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज श्री बालाजी व श्री भगवान बाबा, बालसुंदरी माता,संत बाळूमामा, अंजनी पुत्र हनुमान
यांसह अनेक संतांच्या व देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.
या सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, सहकार, व्यापार, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (नवी मुंबई) विजयभाऊ चौधरी उपस्थित राहणार आहेत.तसेच, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलचे अध्यक्ष सुमेरचंद अगरवाल सर , संचालक रवीकुमार अगरवाल सर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
“मुळशीतील भाविकांना पंढरपूर, आळंदी आणि देहूचा अनुभव एकाच ठिकाणी मिळावा, या शुद्ध भावनेतून या भक्तीधामाची निर्मिती करण्यात आली आहे.” गेली 37 वर्ष भाविकांना मोफत आषाढी पंढरपूर यात्रा घडविण्याचे पुण्याचे काम अप्पानी केले आहे.
— पै. ह. भ. प. मोहन आप्पा वणवे
या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी या मंगलमयी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठल-रुक्मिणी सेवा प्रतिष्ठानचे पै भूषण दादा वणवे (संस्थापक /अध्यक्ष – मा. पै. मोहन अप्पा वणवे युवा मंच )
(उपाध्यक्ष -विठ्ठल रुख्मिणी सेवा प्रतिष्ठान )
पै निखिल भाऊ वणवे (कार्याध्यक्ष -विठ्ठल रुख्मिणी सेवा प्रतिष्ठान ) यांच्या वतीने करण्यात आले आहे




































