इयत्ता 10 वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण उमेदवारांसाठी 1 व 2 वर्षे मुदतीच्या एकूण 29 विविध ट्रेडसाठी एकूण 1 हजार 388 जागा उपलब्ध आहेत..
पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक सातपूर रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑगस्ट 2025 साठी ऑनलाईन प्रवेश अर्ज इच्छुक उमेदवारांनी 26 जून 2025 पर्यंत http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर सादर करावे, असे आवाहन संस्थेचे उपसंचालक आर.एस.मुंडासे यांनी केले आहे.
इयत्ता 10 वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण उमेदवारांसाठी 1 व 2 वर्षे मुदतीच्या एकूण 29 विविध ट्रेडसाठी एकूण 1 हजार 388 जागा उपलब्ध आहेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरूस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे यांसाठी 26 जून 2025 ही मुदत असून 27 जून 2025 पर्यंत अर्ज निश्चित करण्याची अंतिम तारीख आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसायनिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्याची अंतिम मुदत 28 जून 2025 अशी आहे. उमेदवारांनी आवश्यक मूळ कागदपत्रांसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जावून अर्ज निश्चिती करायचे आहे.
अर्ज भरणे, विविध ट्रेडस, अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी स्वा. सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...