देवळाली पोलीस ठाणे हद्दीत जुण्या भांडणाची कुरापत काढुन मारहाण व शिवीगाळ करत कोयत्याने जबर जखमी केल्याचा गुन्हा दि.25 एप्रिल रोजी दाखल झाला होता..
पोलीस वार्ता, नाशिक : शहरात दिवसाआड खून्हाच्या घटना घडताना दिसत आहे. यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे व गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे पोलीसांपुढे आव्हान बनले आहे. नाशिक मधील देवळाली पोलीस ठाणे हद्दीत जुण्या भांडणाची कुरापत काढुन मारहाण व शिवीगाळ करत कोयत्याने जबर जखमी केल्याचा गुन्हा दि.25 एप्रिल 2025 रोजी दाखल झाला होता. यासंबंधी आरोपीला पकडून कारवाई करण्याबाबत नाशिक पोलीस आयुक्त मा.श्री संदीप कर्णिक साहेब यांनी आदेश दिले होते.
मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी व्यक्ती हे त्यांच्या पत्नीसह भगुर बसस्टॉप जवळून दि.25 एप्रिल 2025 रोजी सायं 5 वाजेच्या सुमारास जात असताना, यांच्या ओळखीचे असलेले आरोपी व त्याचे इतर साथीदार यांनी जुण्या भांडणाची कुरापत काढून फिर्यादी यांना लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करून त्यांचे जवळ असलेल्या कोयत्याने डोक्यास व उजव्या हातास गंभीर दुखापत केली. यावरून फिर्यादी यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे गुरनं ३७/२०२५ भा.न्या.सं.क 118(2), 118(1), 115(2), 352, 3(5) सह.म.पो.का कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
त्यानुसार शहर गुन्हेशाखा युनिट-2 च्या पथकाकडून गुन्ह्याचा तपास करून आरोपींचा शोध घेत असतांना दि.2 मे 2025 रोजी सपोउनि. गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली की, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील सदर आरोपी सुनिल भालेराव हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असुन तो आनंद कॉम्लेक्स येथे येणार आहे. ही माहीती मिळताच ती शहर गुन्हेशाखा युनिट-2 सपोनि. हेमंत तोडकर यांना देवून त्यांच्या मार्गदर्शनात सपोउनि. गुलाब सोनार, पोह. सुनिल आहेर, पोअंम. प्रविण वानखेडे, संजय पोटींदे यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहीतीच्या आधारे आनंद रोड, गोडसे कॉम्लेक्स येथे सापळा लावुन आरोपी सुनिल अशोक भालेराव (वय-23) रा. आनंदरोड, आंबेडकर सोसायटी, देवळाली कॅम्प, नाशिक यास ताब्यात घेवुन गुन्ह्याची चौकशी केली असता त्याने कबुली दिली, त्यामुळे पुढील कारवाईसाठी आरोपीस देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात रिपोर्टासह हजर केले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात श्रेणी. पोउनि. मुक्तारखान पठाण, प्रकाश महाजन, यांचा देखील समावेश होता.
✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता
( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास
खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता
( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास
खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...