जळगाव पोलिसांनी चार तासांच्या भयानक कामगिरीने मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने बंदिस्त पोलीस नाईक शशिकांत पारधी यांना सुखरूप सोडवण्यात यश आले.

पोलीस वार्ता, चोपडा : उमर्टी गावात पोलिसाचेच अपहरण झाले? सातपुड्याच्या डोंगर दऱ्यात महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर दोन्ही बाजूला उमर्टी गाव विभागले गेले आहे. गावाचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा नदीच्या पलीकडील भाग मध्यप्रदेशात येतो. उमर्टी गावात अवैध बंदूक, देशी कट्टे बनविण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. अश्याच एका गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधात चोपडा ग्रामीण पोलीस गेले असता आरोपीला शोधून अटक केल्यानंतर आरोपीच्या नातलगांनी पोलीस कर्मचाऱ्याला पकडून त्याचे अपहरण करून मध्य प्रदेशातील उमर्टी गावात डांबून ठेवले.

याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्यासह पो.नि. कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. शेषराव नितनवरे, चेतन महाजन, विशाल पाटील, दिपक शिंदे, किरण पारधी यांचे पथक मध्यप्रदेशच्या सिमेलगत असलेल्या उमर्टी गावात गेले. येथे शिकलकर जमातीकडून मोठ्या प्रमाणात गावठी कट्टाची तस्करी होत असतेच. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नाईक शशिकांत पारधी यांना बंदिस्त करून मध्यप्रदेश हद्दीतील उमर्टी गावात बंदिस्त करून ठेवले आहे.
जळगाव पोलिसांनी चार तासांच्या भयानक कामगिरीने मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने बंदिस्त पोलीस नाईक शशिकांत पारधी यांना सुखरूप सोडवण्यात यश आले. पोलिसांच्या या प्रयत्नात दोन पोलीस कर्मचारी सहा.पो.नि.शेषराव नितनवरे, शिपाई किरण पारधी हे जखमी झाले आहेत.




































