भुसावळ (निलेश फिरके) येथे नगरपालिका निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाची प्रक्रिया १९१ केंद्रांवर पूर्णपणे शांततेत पार पडली. या निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.१९ दिवसा साठी उमेदवारां चे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे .
नगर पालिका निवडणूकीच्या ५० जागा पैकी तीन उमेदवार बिनविरोध झाले तर तीन उमेदवार न्यायालयात गेल्याने ४४ जागासाठी २३८ उमेदवार नगरसेवक पदासाठी तर आठ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात होते .
सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाची गती संथ आणि सुरळीत होती. प्रारंभी मतदारांनी लाईनी त न उभे राहता शांतपणे मतदानाचा हक्क बजावत असल्याचे चित्र दिसून आले. यावेळेस केवळ २० टक्के मतदान झाले होते .
मंत्री संजय सावकारे व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांनी ११ वाजता मतदानाचा हक्क बजावला .
परंतु दुपारी बारा ते दोन या कालावधीत अनेक मतदान केंद्रांवर तुलनेने शुकशुकाट जाणवत होता. या वेळेत मतदारांची उपस्थिती कमी दिसल्याने केंद्रांवर शांत वातावरण होते.तीन वाजे पर्यत ३५ टक्के मतदान झाले होते .
दरम्यान, दुपारी तीन वाजल्यानंतर परिस्थितीत बदल झाला सिंधी कॉलनी , म्युनिसिपल हायस्कूल , उर्दू शाळा या प्रमाणे बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांची लक्षणीय वाढ दिसू लागली. वाढत्या गर्दीमुळे मतदानाच्या निर्धारीत वेळेत गेट च्या मध्ये आलेल्या मतदारांची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू राहिली.
एकूण १२०० कर्मचारी या कार्यासाठी नियुक्त करण्यात आले होते . १ लाख ७८ हजार मतदार भुसावळ मध्ये आहेत यात ९० हजाराहून अधिक पुरुष तर महीला ८७ हजाराहून आधिक महिला व ३७ तृतीय पंथीय असा सामावेश आहे . त्यातील मतदारांनी ९ ८ १७७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला आहे एकूणच, कोणतीही अनुचित घटना घडू न देता भुसावळमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत जितेंद्र पाटील सहा निवडणूक अधिकारी संतोष विनंते यांनी काम पाहिले .
दरम्यान एम आय तेली स्कूल या केंद्रांवर पावणे सहा वाजेला ५० ते ६० जणांचा जमाव आला होता पोलिसांनी जमावाला पगरा पांगरा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .
शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राहुल वाघ , शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक उध्वव डमाळे जळगाव स्पेशल पोलीस फोर्स व पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .




































