पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील भगुर नगरपरिषदेच्या 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियाचा मतमोजणी निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. यासाठी मतमोजणी केंद्र विहितगाव महानगरपालिका शाळा क्र.164 हे ठिकाण निवडण्यात आले असून या परिसरातील मार्गावर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमणार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी व अपघात घडण्याची शक्यता टाळण्यासाठी कायदा व सुव्यवस्था आबाधित राहून मतमोजणी प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी 3 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत मोटार वाहन कायदा कलम 115, 116 (1) (अ) (ब) अन्वये प्राप्त अधिकारान्वये नाशिक सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे/ विशा) संदीप मिटके यांनी वाहतुक मार्गात अधिसूचना देऊन बदल केला आहे. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियम 1988 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, हा परिसर शहरातील उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत येतो.
अधिसूचनेनुसार विहितगाव सिग्नल कडून वडनेर, पाथर्डीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या दोन्ही बाजुकडील वाहनांना विहितगाव सिग्नल ते पुढे असलेल्या वडनेर मार्गावरील काका हंडोरे चौक यादरम्यान प्रवेश बंदी केली आहे. परंतु वाहतुक ही, पर्यायी मार्गाचे विहितगाव सिग्नल-देवळाली गाव- सत्कार पॉईंट- अनुराधा चौक- आर्टीलरी सेंटर रोड- खोले मळा कॉर्नर- रोकडोबावाडी- काका हंडोरे चौक मार्गे वडनेर, पाथर्डीकडे जाण्या व तिकडून येण्यासाठी वळविली आहे. तसेच जड- अवजड वाहतुक ही, पाथर्डीगाव सर्कल, कलानगर- वडाळा गाव- सम्राट सिग्नल नाशिक-पुणे हायवे मार्गे वळविली आहे.
सदर निर्बंध हे भगुर नगरपरिषद मतमोजणी निमित्ताने मतमोजणी प्रक्रीया संपेपर्यंतच अंमलात राहणार आहे. हे निर्बंध जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने, पोलीस सेवेकरीता असलेली वाहने, अग्निशमन दलाची वाहने, शववाहिका व रूग्णवाहिका यांना लागु राहणार नाहीत.
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी..
पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...