Homeक्राईमजळगाव एसीबीची भुसावळात धडक कारवाई

जळगाव एसीबीची भुसावळात धडक कारवाई

बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह खासगी पंटराविरोधात लाचखोरीचा गुन्हा

भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे आणि त्यांचा खासगी पंटर सलीम हाकीम कुरेशी यांच्याविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गुन्ह्यातील संशयितांना अटक न करता केवळ चॅप्टर कारवाई करून सोडण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च २०२६ रोजी भुसावळातील खडका चौक परिसरात एका ठेकेदार व त्याच्या मित्रास काही इसमांकडून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८०/२०२६ दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना अटक न करता फक्त चॅप्टर केस करून सोडण्यासाठी संबंधित ठेकेदाराच्या पत्नीकडे सुरुवातीला ३० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर ठेकेदाराने उपनिरीक्षक राजू सांगळे यांची भेट घेतली असता “तडजोड व तमाशा खर्च” या नावाखाली आणखी २० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लाच देण्यास नकार देत संबंधित ठेकेदाराने ७ एप्रिल २०२६ रोजी जळगाव एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली. एसीबीने प्राथमिक पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. एप्रिल महिन्यात आरोपींकडून लाच स्वीकारण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, संशय आल्याने आरोपींनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नसल्याची माहिती समोर आली. तरीदेखील तपासात लाचेची मागणी निष्पन्न झाल्यानंतर शुक्रवारी (दि. २९ मे) आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या प्रकरणातील खासगी पंटर सलीम हाकीम कुरेशी (वय ४६, रा. कुरेशी मोहल्ला, बोदवड) यास एसीबीने ताब्यात घेतले आहे. तर उपनिरीक्षक राजू सांगळे हे सध्या सीक रजेवर असल्याची माहिती असून त्यांना “पाहिजे आरोपी” घोषित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांचा शोध सुरू आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व ७(१)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर यापूर्वीही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. शहरातील वाढत्या चोऱ्या, सट्टा-मटका, अवैध धंदे व कथित हप्तेखोरीबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने नाराजी वाढली होती. अशातच आता समोर आलेल्या या लाचखोरी प्रकरणामुळे पोलिस प्रशासनावरील विश्वासाला मोठा धक्का बसला असून “बाजारपेठ पोलिसांवर वरिष्ठ अधिकारी कठोर कारवाई करणार का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे (सापळा अधिकारी), हेमंत नागरे (तपासी अधिकारी), रेश्मा अवतारे, दीपक पाटील, अमोल सूर्यवंशी, भूषण पाटील, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक भारती तांगडे, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील डोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाजनको रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला त्रास? ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी;अश्लील मेसेज पाठवल्याचाही आरोप

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र (महाजनको) रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापकांकडून मानसिक त्रास देत ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी...

अन्न व औषध प्रशासनाच्या मोहीमेत 1 लाख 19 हजार रुपये किंमतीचा अन्नपदार्थ साठा जप्त!

अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक : अन्न व औषध प्रशानाकडून नागरिकांना...

पोलीस आयुक्तांकडून शहरात 12 जून मध्यरात्री पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी!

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये होणार कारवाई.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक...

महाजनको रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याची ‘वसुली’ थांबवताच पदावनती?

0
कोरोना योद्धा सिस्टरला वरिष्ठांचा मानसिक छळ; वैद्यकीय अधिकारी व व्यवस्थापकांवर गंभीर आरोप भुसावळ (निलेश.के.फिरके)  तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र (महाजनको) रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला सिस्टरला...

स्वा.सावरकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात व जल्लोषात भगूरमध्ये साजरी!

भगूर शहरामध्ये जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन, यात असंख्य नागरिक, युवक, महिला व विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.. पोलीस वार्ता, देवळाली : स्वातंत्र्यवीर...

error: Content is protected !!