Homeआरोग्यबनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे. संबंधित महिला दहावी नापास असून, सुमारे ५० हजार रुपये देऊन तिने नोकरी मिळविल्याची चर्चा रुग्णालय परिसरात सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महिलेच्या शैक्षणिक पात्रतेतील कथित त्रुटी आणि नियुक्ती प्रक्रियेतील अनियमिततेची माहिती वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापकांना होती. याचाच गैरफायदा घेत संबंधितांकडून महिलेकडून दरमहा आर्थिक रक्कम उकळण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरमहा पैसे देण्यास महिलेने नकार दिल्यानंतर तिच्यावर दबाव टाकण्यात आला. अखेर तिला पदावरून पायउतार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एवढेच नव्हे तर संबंधित महिलेला अश्लील संदेश पाठविण्यात आल्याचाही गंभीर आरोप सूत्रांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे महाजनको रुग्णालयातील कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, नियुक्ती प्रक्रिया, कथित आर्थिक व्यवहार आणि महिला कर्मचाऱ्यावरील वागणुकीची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची बाजू समजू शकलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!