Homeआरोग्यअन्न व औषध प्रशासनाच्या मोहीमेत 1 लाख 19 हजार रुपये किंमतीचा अन्नपदार्थ...

अन्न व औषध प्रशासनाच्या मोहीमेत 1 लाख 19 हजार रुपये किंमतीचा अन्नपदार्थ साठा जप्त!

अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई होणार..

पोलीस वार्ता, नाशिक : अन्न व औषध प्रशानाकडून नागरिकांना दर्जेदार व सकस अन्न पदार्थ मिळावेत यासाठी जिल्ह्यात तपासणी मोहीम केली जात असून जिल्ह्यात दि.27 मे 2026 रोजी विविध ठिकाणी केलेल्या तपासणीत आढलेलेल्या संशायस्पद अन्न पदार्थांचा 1 लाख 19 हजार 712 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती सहआयुक्त दि.ज्ञा.तांबोळी यांनी दिली आहे.
जेलरोड, नाशिकरोड येथील मे.अजनी ट्रेडर्स या पेढीची तपासणी केली असता ही पेढी विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. या पेढीत विक्रीसाठी आढळलेले Cafenated Beverage (Sting) व एनर्जी ड्रिंक या दोन अन्न पदार्थांचे नमुने घेवून उर्वरित रूपय 31 हजार 680 किंमतीचे 1 हजार 584 बाटल्या भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून साठा सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
पंचवटी, मार्केट यार्ड या ठिकाणी मे.नेहा फुड प्रॉडक्टस् या पेढीच्या तपासणीतही विनापरवाना विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. पेढीत विक्रीसाठी मैदा पापड व स्नॅक्स या दोन अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित रूपये 13 हजार 568 किंमतीचा 336 किलोग्रॅम साठा भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
मे.बालाजी ट्रेडिंग कंपनी, त्र्यंबकेश्वर, नाशिक या पेढीच्या तपासणीत या पेढीत विक्रीसाठी असेलेले रिफाइंड सोयाबीन ऑइल हे खुल्‍या स्वरूपात विक्री होत असल्याचे आढळले, या तेलाचे नमुने तपासणीसाठी घेवून रूपये 68 हजार 864 किंमतीचा 430 किलोग्रॅमचा साठा जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथे मे.गुरूदत्त छाया डेअरी या पेढीच्या तपासणीत पेढीत अनारोग्य परिस्थितीत पनीर या अन्न पदार्थाचे उत्पादन व विक्री होत असल्याचे निदर्शनास आले अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित रूपये 3 हजार 200 किंमतीचा 10 किलोग्रॅम साठा भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.
मे.स्वामी बेव्हरेजस, माळेगाव, सिन्नर या पेढीत विक्रीसाठी आढळलेले स्वीटेन्ड कॉरबॉन्टेड बिव्हरेजेस या अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवून रूपये 2 हजार 400 रु. किंमतीच्या बाटल्या भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून साठा सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
तपासणीत घेण्यात आलेले अन्न नमुने विश्लेषणासाठी संबंधित अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न व सुरक्षा मानके कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. अन्न व सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशान्वये अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, संकेत येलमामे, गोविंदा गायकवाड, प्रतिक भड, सुहास मंडलिक, संदीप तोरणे यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न) मनीष सानप, संदीप देवरे, दिनेश तांबोळी यांच्या उपस्थितीत व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पाडली. भेसळयुक्त अन्न पदार्थांसंदर्भात तक्रार तसेच गोपनीय माहिती असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा, असे अन्न व औषध प्रशानाकडून सांगण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!