Homeउद्योगशेतीच्या यांत्रिकीकरणाला गती देण्यासाठी महिला बचत गटांनी ‘कृषी औजारे बँक’ योजनेचा लाभ...

शेतीच्या यांत्रिकीकरणाला गती देण्यासाठी महिला बचत गटांनी ‘कृषी औजारे बँक’ योजनेचा लाभ घ्यावा!

प्रकल्प गावांतील उमेद (MSRLM) किंवा माविम (MAVIM) अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट व ग्रामसंघ या योजनेस पात्र आहेत..

पोलीस वार्ता, नाशिक : शासनाच्या कृषी विभागामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA) टप्पा-2’ अंतर्गत गावस्तरावर शेती कामांच्या यांत्रिकीकरणाला गती देण्यासाठी ‘कृषी औजारे बँक’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊन महिला बचत गटांनी आपले उत्पन्न वाढवावे तसेच शेतकऱ्यांना माफक दरात सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन ‘आत्मा’ चे नाशिकचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद यांनी केले आहे.

योजनेचा उद्देश
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसल्याने, त्यांना गावस्तरावरच परवडणाऱ्या दरात भाडेतत्त्वावर यंत्रे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे शेतीतील मजुरी खर्चात बचत होऊन कामांची गती वाढेल तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक फायदेशीर ठरण्यास मदत होईल.
पात्रता व अटी
प्रकल्प गावांतील उमेद (MSRLM) किंवा माविम (MAVIM) अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट व ग्रामसंघ या योजनेस पात्र आहेत. बचत गटात किमान 10 सदस्य असणे आवश्यक आहे. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास ऑनलाईन लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल. ज्या गटांनी यापूर्वी इतर योजनांमधून कृषी औजारे बँकेचा लाभ घेतला आहे, ते या योजनेस पात्र राहणार नाहीत.
अनुदानाचे स्वरूप
या योजनेअंतर्गत कृषी औजारे बँकेसाठी प्रकल्प मूल्याच्या 60 टक्के अनुदान देण्यात येणार असून कमाल मर्यादा 24 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्प मूल्य 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास बँक कर्ज घेणे बंधनकारक राहील.
निवडण्यात येणारी यंत्रे
बचत गटांना त्यांच्या परिसरातील पीक पद्धतीनुसार ट्रॅक्टर, बीबीएफ (BBF) यंत्र, बेड मेकर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र आदी हवामान अनुकूल कृषी औजारे निवडता येतील. ट्रॅक्टर खरेदी करावयाची असल्यास त्यासोबत आवश्यक पूरक अवजारे घेणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक महिला बचत गटांनी ‘FPO-DBT Portal’ या वेब प्लॅटफॉर्म किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व बँक तपशील सादर करणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी www.ndksp.mahapocra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहनही प्रकल्प संचालक श्री काशिद यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!