पिशवीत सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, अंगठ्या व इतर दागिने असा एकूण 26 तोळे सोन्याचा ऐवज होता..
पोलीस वार्ता, भुसावळ : MSRTC बसने प्रवास करत असताना एका महिलेच्या पिशवीतून सुमारे 6 लाख 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये दि.5 मे 2026 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी नंदा सुरेश गोराडकर (वय -59), रा. श्रीराम नगर, जामनेर रोड, भुसावळ या आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी दि. 2 मे 2026 रोजी सकाळी MSRTC बसमधून प्रवास करत होत्या. भुसावळ बसस्थानकावरून निघालेल्या बसमध्ये मोठी गर्दी असल्याने त्या बसमध्ये उभ्याच प्रवास करत होत्या. याचदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांना न कळता त्यांच्या पर्समधील दागिन्यांची पिशवी लंपास केली.
बसमधून उतरल्यावर नंदा गोराडकर यांनी पर्स तपासली असता दागिन्यांची पिशवी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ नातेवाईकांना माहिती दिली व पोलिसांत धाव घेतली आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या पिशवीत सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, अंगठ्या व इतर दागिने असा एकूण 26 तोळे सोन्याचा ऐवज होता. या सर्व दागिन्यांची किंमत सुमारे 6 लाख 70 हजार रुपये असल्याचे तक्रारीत फिर्यादी यांनी नमूद केले आहे. पोलिसांकडून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोनि. राहूल वाघ यांच्या आदेशावरून गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनिरी.मंगेश जाधव हे करीत आहे. दरम्यान, बसमध्ये वाढती गर्दी आणि अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हिंगोली (मीनाक्षी पोळ) येथे आज दिनांक12 मे 2026 रोजी शहरातील हिंगोली नगरपालिकेच्या कल्याण मंडपम् येथे संबोधी ॲकडमी महाराष्ट्र, सरस्वती महिला सेवाभावी संस्था व हिंगोली...
सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद; आंदोलनानंतर राजगड पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला
कापूरहोळ (ता. भोर) येथे पत्रकारावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल करणाऱ्या...
पुणे : पत्रकारितेचे काम करत असताना मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार राम शिवाजी पाचकाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय,...
(युवराज लोणारी यांचे संतोष चौधरींना जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आव्हान)
भुसावळ : (निलेश.के.फिरके) येथील नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदावरून शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, भाजप गटनेते युवराज...
प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार नेमका कोणाच्या आदेशाने स्वीकारण्यात आला? हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे..
पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.गायत्री भंगाळे...