संविधानातील अनुच्छेद 243K व 243ZA नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधीक्षण, संचालन, निर्देशन आणि नियंत्रणाची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे..
पोलीस वार्ता, मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले की, संसदीय, विधानमंडळ तसेच राष्ट्रपती–उपराष्ट्रपती निवडणुका घेण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगाची आहे. तर दुसरीकडे, संविधानातील अनुच्छेद 243K व 243ZA नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधीक्षण, संचालन, निर्देशन आणि नियंत्रणाची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हे, इमारतींची दृश्ये किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर केल्याचे काही प्रकरणे दिसून आली आहेत. यातील संभ्रम दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून संसदीय, विधानमंडळ निवडणुकांसाठी राज्यात कामकाज पाहण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय अधिकारी एस. चोक्कलिंगम कार्यरत आहेत.तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आयुक्त पदावर निवृत्त प्रधान सचिव दिनेश वाघमारे हे कार्यरत आहे.
दोन्ही आयोगांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी व स्वतंत्र असल्याने स्थानिक स्वराज्य निवडणुकांशी संबंधित बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह, अधिकारी, इमारती अथवा तत्सम दृश्यांचा वापर करणे चुकीचे असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, राज्य निवडणूक आयोगाशी संबंधित बातम्यांमध्ये झालेल्या अशा चुकांची तातडीने दुरुस्ती करून संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांतून हटवावेत, असे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसारमाध्यमांना करण्यात आले आहे.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...