Homeउद्योगमनमाड, देवळा, पेठ पोटनिवडणुकांच्या तयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी घेतला आढावा!

मनमाड, देवळा, पेठ पोटनिवडणुकांच्या तयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी घेतला आढावा!

मनमाड नगरपरिषदेमधील 2 पदे, देवळा नगरपंचायतीतील 1 पद आणि पेठ नगरपंचायतीतील 1 पद अशा एकूण 4 रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका 20 जून रोजी..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोटनिवडणुकांच्या अनुषंगाने दि.22 मे रोजी आढावा बैठक पार पडली यावेळी मनमाड नगरपरिषद तसेच देवळा व पेठ नगरपंचायतीतील रिक्त पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत मनमाड नगरपरिषदेमधील 2 पदे, देवळा नगरपंचायतीतील 1 पद आणि पेठ नगरपंचायतीतील 1 पद अशा एकूण 4 रिक्त पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या पदांसाठी 20 जून 2026 रोजी होणाऱ्या मतदान यंत्रणेची तयारी, आवश्यक मनुष्यबळ आणि साहित्य उपलब्धतेचा आढावा घेतला गेला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संबंधित क्षेत्रांतील संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची स्थिती, त्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या विशेष उपाययोजना तसेच निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थापनाबाबतची माहिती जाणून घेतली. मतदान केंद्रांवर मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह, रॅम्पसह दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तयारीचाही त्यांनी आढावा घेतला.
मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून नियनबद्ध पद्धतीने कामकाज करावे, तसेच मतदानाच्या दिवशी मतदारांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर द्यावा, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच प्रत्येक निवडणूक केंद्रातील मतदारसंख्या, मतदान केंद्रांची संख्या, प्राप्त झालेली नामनिर्देशन पत्रे, निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन, प्रशिक्षण व्यवस्था आणि निवडणूक साहित्याची उपलब्धता याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील नगरपरिषद पोटनिवडणूक संदर्भातील आवश्यक तयारीची माहिती दिली. पोलीस आयुक्त (ग्रामीण) डॉ. स्वामी यांनी पोटनिवडणूक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था संदर्भात केलेल्या तयारीची माहिती विषद केली. या बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. डि.एस. स्वामी, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, नगरपालिका शाखेचे सहआयुक्त शाम गोसावी, सहा. आयुक्त स्नेहल विसपुते, मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, पेठ नगरपंचयातचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, देवळा नगरपंचायत मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर आदी अधिकारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!