दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..

पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय लोकार्पण सोहळा कार्यक्रम देवळाळीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते दि.12 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी भगूर नगराध्यक्षा सौ.प्रेरणा बालकवडे व आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार अहिरे म्हणाल्या, “काही लोक फक्त बॅनरबाजी आणि श्रेय घेण्यात व्यस्त आहेत. मला राजकारण करायला वेळच नाही. माझ्या टेबलावर आणि मतदारसंघात फक्त विकास कामांच्या फाईलींची रांग लागली आहे. बोरखिंड इंटरचेंज असो, पाणी योजना असो वा स्मशानभूमी असो, माझे काम मी बोलून नाही तर, करून दाखवते.”











यावेळी तहसिलदार पंकज पवार, मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल, तलाठी राजेंद्र खैरनार, तलाठी सहा. तुषार कुंडारीया, उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, नगरसेवक दीपक बलकवडे, काकासाहेब देशमुख, विशाल बलकवडे, बबलु पवार, मृत्यूंजय कापसे, विद्याताई बलकवडे, जयश्री देशमुख, सुजाता शिरसाठ, लता थापेकर, अश्विनी भवार यांचेसह नगरपरिषदेचे अधिकारी सिद्धेश मुळे, रविंद्र संसारे यांचेसह नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी

























