विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक..

पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक संघ, भगूर यांच्या वतीने करण्यात आले होते. विध्यार्थी घडवण्याचे कार्य, त्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे महत्वपूर्ण कार्य शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघ भगूरचे काळजीवाहू अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले.





































