Homeक्राईमभुसावळ मध्ये रेल्वे कर्मचाऱ्याची ड्युटीवर निर्घृण हत्या; आरोपीला तात्काळ अटक!

भुसावळ मध्ये रेल्वे कर्मचाऱ्याची ड्युटीवर निर्घृण हत्या; आरोपीला तात्काळ अटक!

शनिवारी कामावर असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे..

पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील कवाडे नगर परिसरात शनिवारी दि.4 जुलै रोजी सायंकाळी 8:30 वाजेच्या सुमारास रेल्वेच्या फिल्टर हाऊसमध्ये ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन तत्काळ त्याला अटक केली आहे.

मिळालेली सविस्तर माहिती अशी की, रेल्वे कर्मचारी प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय-58 वर्षे) हे कवाडे नगर मधील रेल्वे फिल्टर हाऊस येथे नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना, रात्री सुमारे 8:30 वाजता आरोपी आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर, भुसावळ) हा त्या ठिकाणी आला. काही कारला वरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. काही क्षणातच या वादाला हिंसक रूप लागले. आकाश याने बाजूला पडलेली लोखंडी पट्टी उचलून प्रसाद यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात प्रसाद गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले तसेच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी आकाश गोरखा याला ताब्यात घेतले. प्राथमिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोरुग्ण असून त्याच्यावर ठाणे येथे उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर या आधी पूर्वीचे 2 गुन्हे दाखल आहेत. मात्र 2021 पासून आजपर्यंत त्याच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचा नवीन गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. या घटनेमुळे भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!