आरोपी भरत बाळासाहेब जगताप हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे..
पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार चोर, गुन्हेगारांचा तपास करणे व अवैध रित्या शस्त्र बाळगणाऱ्या सराईतांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा व संबंधित पोलीस ठाण्याना दिले आहेत.
त्यानुसार शहरात तपास करत असताना नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकातील पोह विशाल काठे व विशाल देवरे यांना दि.22 सप्टेंबर 2025 रोजी गुप्त माहिती मिळाली की, पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असलेला भरत जगताप हा देशी पिस्तोल जवळ बाळगून स्टेट बँक ऑफ इंडीया चौक, लेखा नगर, अंबड या परिसरात दहशत पसरवत आहे. सदर माहितीची खात्री करून शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे वपोनि मधुकर कड यांना ती देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोउनि चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, श्रेणी पोउनि किरण शिरसाठ, पोह. संदिप भांड, प्रदीप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोअं अमोल कोष्टी, मुक्तार शेख यांचे पोलीस पथक तयार करून माहिती मिळालेल्या ठिकाणी पाठवण्यात आले. पोलीस पथकाने लेखा नगर एसबीआय चौकातून एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली त्याने त्याचे नाव भरत बाळासाहेब जगताप (वय-33), रा- मु.पो. खाणगावथडी, ता.निफाड, जि.नाशिक असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळून एक देशी पिस्तोल अंदाजे किंमत 30 हजार रुपये हे मिळून आले. त्याच्याकडे पिस्टलचा कुठलाही परवाना नव्हता.
आरोपी भरत बाळासाहेब जगताप हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. 1) सायखेडा पोलीस ठाणे येथे 4 गुन्हे दाखल, गुरनं- 134/2025, गुरनं- 932/2021, गुरनं- 242/2020, गुरनं- 62/2018.
2) निफाड पोलीस ठाणे येथे 2 गुन्हे दाखल, गुरनं- 176/2025, गुरनं-419/2023.
3) लासलगाव पोलीस ठाणे येथे 1 गुन्हा दाखल, गुरनं- 732/2021.
4) पंचवटी पोलीस ठाणे येथे 2 गुन्हे दाखल, गुरनं- 451/2024. गुरनं- 444/2821
आरोपीला अंबड पोलीस ठाण्यात हजर करून पोह. विशाल काठे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी आरोपीला अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात मिलींदसिंग परदेशी, नाझीमखान पठाण, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, मपोअं अनुजा येलवे यांचा देखील समावेश होता.
✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...