Homeआरोग्ययावल नगरपरिषद आरोग्य विभागाची मनमानी, मुतारी व शौचालयांची दुर्गंधीमुळे दुर्दशा, नागरिकांमध्ये तीव्र...

यावल नगरपरिषद आरोग्य विभागाची मनमानी, मुतारी व शौचालयांची दुर्गंधीमुळे दुर्दशा, नागरिकांमध्ये तीव्र रोष!

यावल नगरपरिषदेत नागरिकांनी वेळोवेळी अस्वच्छतेच्या, घाणीच्या तक्रारी करून देखील त्यांची दखल घेतली जात नाही..

पोलीस वार्ता, भुसावळ : यावल शहरातील नगरपरिषद सध्या नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यास असमर्थ असून नागरिकांनी वेळोवेळी अस्वच्छतेच्या, घाणीच्या तक्रारी करून देखील त्यांची दखल घेतली जात नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपरिषद मुख्य अधिकारी हे कार्यालयात उपस्थितच नसतात ते नेहमी दौऱ्यावर बाहेर असल्याचे नागरिकांना सांगण्यात येते, तसेच नगरपरिषद आरोग्य विभाग, सफाई कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने ते व्यवस्थित काम करत नाही, मनमानी करतात यामुळे नागरिकांमध्ये नगरपरिषदेविषयी तीव्र नाराजी पहायला मिळत आहे.
यावल शहरात बाजारपेठेत एकमेव पुरुषांसाठी मुतारी/स्वच्छतागृह आहे. परंतु नगरपरिषद आरोग्य विभागाकडून त्याची कुठलीही साफसफाई केली जात नाही. त्यामुळे तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून याचा दुर्गंध परिसरात पसरला आहे. यामुळे बाजारातील दुकानदार तसेच व्यापारी वर्ग आणि जवळील धार्मिक स्थळ सगळेच त्रासले असून नगरपरिषदेच्या आरोग्य अधिकारी व सफाई कर्मचाऱ्यांवर नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे. तसेच शहरात प्रमुख रस्त्यांवर घाणीचे, कचऱ्याचे ढीग पहायला मिळतात. शहरातील इतर ठिकाणी असलेल्या मुतारी, स्वच्छतागृह, शौचालयांची वेळोवेळी साफसफाई होत नसून तिथे देखील दुर्गंधीमुळे नागरिक रोगराईच्या व दुर्गंधीच्या वातावरणात राहत आहे. परंतु नगरपरिषद सफाई कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.

तसेच शहरात नवीन सिमेंट काँक्रीटचे चेंबर ढापे लावण्यात आले ते निकृष्ट दर्जाचे असून संबंधित कॉन्ट्रॅक्टरने नियम व अटीनुसार काम केलेले नसून कॉन्ट्रॅक्टरने सोयीनुसार हलक्या प्रतीचे मटेरियल वापरले आहे. असा आरोपच लोकांनी व्यक्त केला आहे. संबंधित कामावर नगरपरिषदेचे जे अधिकारी पाहणी करता आहेत अथवा केले आहे त्यांची देखील चौकशी नगरपरिषदेने करावी व दोशींवर कारवाई करावी अशा अनेक मागण्या करत, प्रशासक तथा प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार यांनी शहरातील या समस्यांवर लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!