Homeआरोग्यडॉ आंबेडकर विद्यार्थी आश्रमाला 'प्रेरणाभूमी' आणि 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित करावे!

डॉ आंबेडकर विद्यार्थी आश्रमाला ‘प्रेरणाभूमी’ आणि ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे!

स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 17 डिसेंबर 1951 साली मनमाड येथील आश्रमाचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले होते..

पोलीस वार्ता, मनमाड : महाराष्ट्राच्या भूमीत महामानव भारतरत्न ‘भीमराव रावजी आंबेडकर’ म्हणजे संविधान निर्माते ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ यांनी ज्या-ज्या स्थळी भेट दिली, आंदोलने केली, वास्तव्य केले आहे. तसेच त्यांच्या उपस्थितीने जो भाग व जागा स्पर्श होऊन गेला आहे. हे सर्व प्रसंग आंबेडकरी अनुयायांच्या जिवाळीचे असून यासर्व स्थळांचा, जागेंचा वारसा जपण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्यांचा विकास करावा व त्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा द्यावा अशी मागणी समस्त आंबेडकर अनुयायांकडून होताना वारंवार दिसत आहे.
त्याचाच एक ऐतिहासिक प्रसंग म्हणजे, महाराष्ट्रातील मनमाड शहरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम हे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी स्थापन केलेल्या दत्तात्रय शिक्षण प्रसारक मंडळातर्फे चालवले जाते. या आश्रमाचे विशेष म्हणजे स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 17 डिसेंबर 1951 साली या आश्रमाचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले होते. शहरात या आश्रमाला ‘प्रेरणाभूमी’ म्हणून ओळखले जाते. हाच दर्जा ‘राष्ट्रीय स्तरावर’ मिळावा यासाठी मनमाड शहरातील आंबेडकरी समाज बांधव व सर्व राजकीय पुढारी हे जोर देत आहे.
प्रमुख म्हणजे मनमाड शहराचा इतिहास आंबेडकरी चळवळीशी जोडलेला गेला आहे, कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 12 आणि 13 फेब्रुवारी 1938 मध्ये ‘जीआयपी रेल्वे डिप्रेस्ड क्लास कामगार परिषदेचे’ अध्यक्ष म्हणून मनमाड येथे भाषण केले होते, या शहरात रेल्वेच्या दलित कामगारांची परिषद घेऊन त्यांच्या हक्कांसाठी एक महत्त्वपूर्ण आवाहन केले होते, या घटनेने मनमाडच्या आंबेडकरी चळवळीला एक नवी दिशा दिली आणि या शहराला दलित कामगारांच्या चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र बनवले. त्यांच्यावरील अत्याचारांबद्दल आवाज उठवला होता. हा दौरा मनमाड शहरातील दलित चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे.
2025 मध्ये मनमाड शहरातील डॉ.आंबेडकर विद्यार्थी आश्रमाला  “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित करणे तसेच या स्थळाला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून दर्जा देणे, याठिकाणी आंतरराष्ट्रीय ज्ञान संकुल उभारणे आणि ’17 नोव्हेंबर’ हा दिवस “प्रेरणादिन” म्हणून साजरा करण्यास मान्यता देणे यासाठी मनमाड येथील मा.नगराध्यक्ष रवींद्र घोडेस्वार, मा.नगरसेवक संतोष आहिरे, समाजसेवक विलास कटारे, संजय निकम, दिपक साळवे, सुनील साळवे यांच्या शिष्टमंडळाने महा.राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस आमदार मा.श्री अण्णा बनसोडे यांची मुंबई येथे भेट घेऊन, निवेदन देऊन, चर्चा केली व स्मारकाच्या संदर्भात प्रस्ताव सादर केला.
शासन सकारात्मक असून ‘राष्ट्रीय दर्जा’ देण्याबाबत लवकरच विचार केला जाईल. असे सांगत, महा.राज्य विधानसभा उपाध्यक्ष मा.आ. अण्णा बनसोडे 17 नोव्हेंबर 2025 रोजी स्वतः मनमाड शहरात स्मारकाला भेट घेण्यासाठी येणार आहे. यावेळी दौऱ्यात संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी, प्रेरणाभूमी विकास कृती समितीचे सदस्य, तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यासोबत ते चर्चा करून पुढील निर्णय व आदेश देणार आहे. विशेष म्हणजे ’17 नोव्हेंबर’ हा दिवस दरवर्षी “प्रेरणादिन” म्हणून साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने हा दौरा नियोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मनमाड शहरात गेल्या बऱ्याच दिवसांपासून या मागणीसाठी प्रेरणाभूमी विकास कृती समितीला विविध सामाजिक संघटना व क्षेत्रातील लोकांचे योगदान मिळाले. ज्यातून एक भव्य आंदोलन उभे करता आले. त्यातून लोकांपर्यंत ही मागणी पोहोचत आली. आता या आंदोलनाची दखल सरकार घेत असून तसे संकेत मुंबईत झालेल्या बैठकीतून दिसत आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मनमाडच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!