Homeआरोग्यनगरपरिषद, नगरपंचायतींनी पाणी, सांडपाणी व्यवस्थापन अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

नगरपरिषद, नगरपंचायतींनी पाणी, सांडपाणी व्यवस्थापन अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा, स्वच्छता व भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराबाबत बैठक..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती आणि मालेगाव महानगरपालिकेने पाण्याची मागणी व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा, स्वच्छता व भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराबाबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा सहआयुक्त श्याम गोसावी (नगरपरिषद प्रशासन), जागतिक बँकेच्या तांत्रिक पथकातील सदस्य, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, महाराष्ट्र शहरी पाणीपुरवठा स्वच्छता पुनर्वापर कार्यक्रम हा राज्य शासनाचा सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प जागतिक बँकेच्या साहाय्याने राबविला जाणार आहे. सांडपाणी व्यवस्थापन, पुनर्वापर आणि संसाधन पुनर्प्राप्तीकरीता जिल्ह्यातील 17 नगरपरिषदा, नगरपंचायती, महानगरपालिकांचे आर्थिक स्थैर्य व पर्यावरणीय परिणाम सुधारण्यासाठी शहरी पाणी व्यवस्थापन लवचिक आणि कार्यक्षम बनविण्यात येणार आहे. त्यासाठी सांडपाणी प्रक्रियेनंतर पाण्याच्या पुनर्वापराबाबतचे नियोजन करावे. सर्व नागरी भागांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचे नियोजन, कचरा स्थळे निश्चित करून ते स्वच्छ करणे तसेच सुशोभीकरण करावे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2025 स्पर्धेत मानांकन उंचावण्यासाठी सर्व नगरपरिषदांनी प्रयत्न करावेत, अशाही सूचना त्यांनी केल्या.
पीएम सूर्यघर योजनेंतर्गत शहरी भागातील सर्व घरांना या योजनेचा दोन महिन्यांत लाभ देण्यासाठी नियोजन करावे. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटी देत नागरी समस्यांचे निराकरण करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणूक कामाचा सविस्तर आढावा घेतला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!