सराईत प्रणव विनोद शेवाळे हा अंबड परिसरात हातात गावठी कट्टा बाळगून फिरत आहे. असल्याची माहिती शहर गुन्हेशाखा युनिट-1 ला मिळाली होती..
पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार चोर, गुन्हेगारांचा तपास करणे व अवैध रित्या शस्त्र बाळगणाऱ्या सराईतांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा व संबंधित पोलीस ठाण्याना दिले आहेत.
त्यानुसार शहरात तपास करत असताना नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकातील पोह. मिलींदसिग परदेशी व पोना. प्रशांत मरकड यांना दि.21 डिसेंबर 2025 रोजी माहिती मिळाली की, सराईत प्रणव विनोद शेवाळे हा अंबड परिसरात हातात गावठी कट्टा बाळगून फिरत आहे. या बातमीची खात्री झाल्यानंतर सदर माहिती शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे वपोनि डॉ.अंचल मुदगल यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोह. मिलींदसिग परदेशी, प्रशांत मरकड, प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, संदिप भांड, विशाल देवरे, नाझीमखान पठाण, पोअं. मुक्तार शेख, चापोह. सुकाम पवार यांचे पोलीस पथक तयार करून माहितीच्या आधारे दिव्य अॅडलब्स थेयटर परिसरात जाऊन पाहणी केली असता संशयित दिसून आला त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले त्याने प्रणव विनोद शेवाळे (वय-23), रा- सावंत रो-हाऊस, कमलनगर, कामठेवाडे, सिडको, नाशिक असे सांगितले. त्याच्या जवळून रुपये 30,000/- किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तोल हस्तगत करण्यात आले. आरोपी विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात पोउनि. चेतन श्रीवंत, श्रेणी पोउनि. किरण शिरसाठ, पोह. रोहिदास लिलके, पोअं. अमोल कोष्टी, उत्तम खरपडे, मपोह. शर्मिला कोकणी यांचा देखील समावेश होता.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...