Homeक्राईम15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक..

पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी लोहमार्ग पोलीस व आरपीएफसह विविध सुरक्षा आणि आपत्कालीन यंत्रणांच्या सहभागातून मॉकड्रिल घेण्यात आले. अचानक एखादी घटना घडल्यास विविध पथके किती तत्परतेने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणू शकतात, तसेच बचावकार्य आणि पुढील कारवाई किती वेळेत पूर्ण करता याची प्रत्यक्ष रंगीत तालीम दि.12 ऑगस्ट रोजी घेण्यात आली.

या कवायतीत लोहमार्ग पोलीस अधिकारी व कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाचे(आरपीएफ) अधिकारी व कर्मचारी, जळगाव येथील क्यूआरटी पथक, बीडीडीएस पथक, श्वान पथक, एटीएस पथक, अग्निशमन पथक तसेच आरोग्य विभागाच्या पथकाने सहभाग घेतला होता.
मॉकड्रिल दरम्यान रेल्वे स्थानकावर संशयास्पद परिस्थिती निर्माण झाल्याचे गृहीत धरून सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. विविध पथकांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा अंदाज घेत कारवाई केली. यावेळी रेल्वे स्थानकावरून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. बीडीडीएस व श्वान पथकाने संशयास्पद वस्तूंची तपासणी, तर इतर पथकांनी परिसर सुरक्षित करण्याची कार्यवाही केली.

आपत्कालीन परिस्थितीत पोलीस, आरपीएफ, क्यूआरटी, एटीएस, बीडीडीएस, अग्निशमन आणि आरोग्य विभाग यांच्यातील समन्वय किती प्रभावी आहे, याचीही या मॉकड्रिलच्या माध्यमातून चाचणी घेण्यात आली. घटना घडल्यास कमीत कमी वेळेत परिस्थिती नियंत्रणात आणून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने या कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचा संदेश पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस, भुसावळ गोविंद पांडव यांनी या मॉकड्रिलमधून दिला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किरकोळ भांडणातून तरुणाच्या पोटावर चाकूने हल्ला

0
भुसावळ : शहरातील खडका रोड परिसरातील ग्रीन पार्क भागात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवार (ता. २८) रात्री...

शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी

0
शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी भुसावळ : शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील विहिरीसमोरील खोलीत मित्रांमध्ये झालेल्या शिवीगाळीच्या वादातून तरुणाचा गळा...

मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून; भुसावळ शहरात घटनेमुळे खळबळ

0
रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35...

आतंकवाद के खिलाफ भारत की जीरो टॉलरेंस नीति देश को दे रही नई दिशा...

0
बुरहानपुर : नगर के बूथ क्रमांक 256 पर सांसद ज्ञानेश्वर पाटील ने स्थानीय नागरिकों एवं कार्यकर्ताओं के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ‘मन की...

अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा ने रोटी बैंक को अनाज दान किया

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...

error: Content is protected !!