रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती..
पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35 वर्षीय तरुणाचा गळा आवळून व डोके जमिनीवर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि.25 सप्राटेंबर रात्री घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पवन अनिल सोनवणे (वय-30 वर्षे, रा. आंबेडकर नगर, वरणगाव) याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मृताचे नाव राहुल सदाशिव धांडे (वय-35 वर्षे, सध्या रा. रेल्वे स्टेशन, भुसावळ) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत राहुल धांडे व आरोपी पवन सोनवणे हे एकमेकांचे मित्र होते. दोघेही भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होते. पवन हा मागील काही काळापासून रेल्वेत चणे-फुटाणे विकण्याचे काम करीत असल्याची माहिती आहे.
बहिण-आईबद्दल शिवीगाळ केल्याचा राग
पोलीस तपासात समोर आले की, राहुल याने पवनच्या आई व बहिणीबद्दल शिवीगाळ केली होती. यापूर्वीही अशाच प्रकारचा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा राग पवनच्या मनात असल्याचा संशय आहे. शुक्रवारी रात्री दोघे सोबत असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याचे सांगण्यात येते. यावेळी पवनने राहुलचा रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
डोक्यासह चेहरा व नाकावर जखमा
घटनेनंतर राहुलचा मृतदेह जुन्या नगरपरिषद आवारातील साई हॉटेल परिसरात आढळून आला. नातेवाईकांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या डोक्याला, तोंडाला तसेच नाकाला मारहाणीच्या जखमा असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरुवातीपासूनच मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत होती. घटनेची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून प्राथमिक तपास सुरू केला.
या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीची चौकशी करण्यात येत असून, खुनामागील नेमके कारण, घटनेची पार्श्वभूमी आणि दोघांमध्ये झालेल्या वादाचा तपशील तपासातून स्पष्ट होणार आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी व पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल. या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली असून, मित्राच्या हातूनच मित्राचा जीव गेल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...
पुरस्काराबद्दल भगूर पुत्र, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांचा समितीला अभिमान आहे..
पोलीस वार्ता, देवळाली | दैनिक लोकमत व वेदनहर्ता आयोडेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवी...
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...
पुरस्काराबद्दल भगूर पुत्र, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांचा समितीला अभिमान आहे..
पोलीस वार्ता, देवळाली | दैनिक लोकमत व वेदनहर्ता आयोडेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवी...