Homeताज्या बातम्यारायगड जिल्ह्यात तापी नदीकाठी 5287 गणेशमूर्तींचे निर्माल्य संकलन!

रायगड जिल्ह्यात तापी नदीकाठी 5287 गणेशमूर्तींचे निर्माल्य संकलन!

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या 448 श्री सदस्यांचा उपक्रम; 18 टन निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठविले..

पोलीस वार्ता, भुसावळ | अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता.अलिबाग, जि.रायगड यांच्या वतीने शुक्रवारी दि.25 सप्टेंबर रोजी तापी नदीकाठी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.
भुसावळ शहरातील तापी नदीवरील पुलाच्या चारही बाजूंना भुसावळ व यावल तालुक्यातील एकूण 448 श्री सदस्यांनी निर्माल्य संकलनाचे काम केले. या उपक्रमादरम्यान घरगुती तसेच विविध गणेश मंडळांच्या 5 हजार 287 गणेशमूर्तींचे निर्माल्य संकलित करण्यात आले. संकलित निर्माल्याची वाहतूक करण्यासाठी एकूण सात ट्रॅक्टर वापरण्यात आले.
संकलनानंतर सदस्यांनी निर्माल्याचे तत्काळ विलगीकरण करून त्यातील सुमारे 18 टन निर्माल्य वृक्षांसाठी खतनिर्मिती करण्याच्या उद्देशाने श्री समर्थ बैठक, अट्रावल येथे पाठविण्यात आले. उर्वरित निर्माल्याची स्थानिक प्रशासनाच्या नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली आहे.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निर्माल्य संकलन उपक्रमाला तापी नदी परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक नागरिकांनी आपल्या घरातील तसेच गणेशोत्सवातील निर्माल्य विश्वासाने सदस्यांकडे सुपूर्द केले. विशेष म्हणजे, अनेक नागरिकांनी यापुढे निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये संकलित न करता पर्यावरणपूरक पद्धतीने देण्याचा स्वैच्छिक संकल्प केला. पर्यावरण संवर्धन, नदी स्वच्छता आणि निर्माल्याची योग्य विल्हेवाट या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कौतुक केले. धार्मिक उत्सवांसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून; भुसावळ शहरात घटनेमुळे खळबळ

0
रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35...

आतंकवाद के खिलाफ भारत की जीरो टॉलरेंस नीति देश को दे रही नई दिशा...

0
बुरहानपुर : नगर के बूथ क्रमांक 256 पर सांसद ज्ञानेश्वर पाटील ने स्थानीय नागरिकों एवं कार्यकर्ताओं के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ‘मन की...

अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा ने रोटी बैंक को अनाज दान किया

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...

श्री गणेश जी को मातृशक्ति महिलाओं ने दी अनंत चतुर्दशी पर बिदाई

0
जयपुर (रमाकांत मोरे) के गोविंद राय जी के रास्ते पर समाजसेविका सीता विजय जी के घर में गणेश जी की स्थापना की गई थी ।...

सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श अधिकारी पुरस्कार!

0
पुरस्काराबद्दल भगूर पुत्र, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांचा समितीला अभिमान आहे.. पोलीस वार्ता, देवळाली | दैनिक लोकमत व वेदनहर्ता आयोडेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवी...

error: Content is protected !!