Homeक्राईमकामायनी एक्सप्रेसमध्ये गुटखा वाहतूक उघड; दोन महिलांविरुद्ध लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल

कामायनी एक्सप्रेसमध्ये गुटखा वाहतूक उघड; दोन महिलांविरुद्ध लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल

कामायनी एक्सप्रेसमधून अवैधरित्या सुमारे 21 हजार 115 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे..

पोलीस वार्ता, भुसावळ | लोहमार्ग पोलिसांनी कामायनी एक्सप्रेसमधून अवैधरित्या सुगंधित पान मसाला (गुटखा) वाहतूक करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध भुसावळ रेल्वे स्थानक येथे कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 21 हजार 115 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.

भुसावळ लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर घायरकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुंबईकडे जाणाऱ्या कामायनी एक्सप्रेस गाडी क्र- 11062 च्या जनरल डब्यातील मागील दरवाजाजवळील पहिल्या कंपार्टमेंटमध्ये दोन महिला गुटखा माल भरलेल्या बॅगा घेऊन प्रवास करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र- 4 वर सायंकाळी 4:45 वाजता गाडी आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी संबंधित डब्याची तपासणी केली असता तपासणी दरम्यान संशयित दोन महिलांच्या ताब्यातील 5 बॅगांमध्ये सुगंधित पान मसाला/गुटखा आढळून आला.

दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पंचनामा करून त्यांच्या ताब्यातून 21 हजार 115 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जयकुमार कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात संबंधित महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर घायरकर यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, जयकुमार कोळी, धनराज लुले, विलास जाधव आणि अंकुश लांडगे यांच्या पोलीस पथकाने मिळून केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!