Homeराजकीयभुसावळमध्ये राजकीय वातावरण तापलं ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे भाजपवर गंभीर आरोप

भुसावळमध्ये राजकीय वातावरण तापलं ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे भाजपवर गंभीर आरोप

भुसावळ : शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरून भुसावळमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नगरसेवकांवर गंभीर आरोप केले आहेत. शहराच्या विकासकामांना मुद्दाम अडथळे निर्माण केले जात असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना भंगाळे म्हणाल्या की, नगरपालिकेच्या बैठकीत वारंवार गोंधळ घालून कामकाजात अडथळे आणले जात आहेत. माईक हिसकावून घेणे, निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण करणे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, “मी सामान्य कुटुंबातील महिला असल्यामुळे मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

शहराच्या विकासासाठी आपण विविध मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगत, त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. जनतेच्या आशीर्वादाने विकासकामे पुढे नेत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक सचिन चौधरी यांनीही भाजपवर टीका करत, भुसावळचा खरा विकास संतोष चौधरी यांच्या कार्यकाळात झाल्याचा दावा केला. तर उल्हास पगारे यांनी भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करून विकासकामे थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
दरम्यान, या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे भुसावळच्या विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने हा वाद थांबून प्रत्यक्ष विकासकामांना गती मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!