मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित जात पडताळणी अर्जांच्या पुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन..
पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयाच्या वतीने 26 नोव्हेंबर, संविधान दिनानिमित्त शैक्षणिक वर्ष इयत्ता 12 वी विज्ञान शाखा तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित जात पडताळणी अर्जांच्या पुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन येत्या 26 व 27 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती अधिकारी योगेश पाटील यांनी दिली आहे.
मोहिमेत समितीकडे ज्या विद्यार्थ्यांचे/अर्जदारांचे प्रकरणे प्रकरणे प्रलंबित आहेत व ज्या अर्जदारांनी त्रुटीची पूर्तता केलेली नाही किंवा ज्या अर्जदारांना समितीकडून ईमेलवर सीसीव्हिआयएस-ll प्रणालीवर त्यांच्या अर्जातील त्रुटी कळविल्या आहेत परंतु त्रुटींची पूर्तता त्यांनी केलेली नाही, अशा इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय अर्जदारांच्या त्रुटींची पूर्तता 26 व 27 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा जात पडताळणी समितीच्या कार्यालयात पूर्ण करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी/अर्जदाराने जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी कोणत्याही तिराहित व्यक्तीच्या अमिषास बळी पडू नये तसेच अशा कोणालाही संपर्क साधू नये. असे आवाहन समितीचे अधिकारी पाटील यांनी केले आहे.
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...