त्रिभाषा गठित समिती नाशिक येथील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह येथे उपस्थित राहून नागरिकांची मते जाणून घेणार आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्रात त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी व त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात कोणत्या इयत्तेपासून सुरू करायचे यासाठी धोरण निश्चितीसाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मंगळवार दि.11 नोव्हेंबर 2025 रोजी, सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत, नाशिक येथील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, के.टी.एच.एम महाविद्यालय जवळ, गंगापुर रोड उपस्थित राहून नागरिकांची मते जाणून घेणार आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिक, भाषातज्ज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संलग्न संबंधित शासकीय, अशासकीय संस्थाचे अध्यक्ष, सदस्य, लोकप्रतिनिधी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटना, पालक, शिक्षण संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, संस्था प्रतिनिधी यांनी येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद, नाशिकचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे सांगितले आहे.






































