Homeताज्या बातम्याकल्याणमध्ये जुन्या इमारतीचा स्लॅब पडून 6 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी; मुख्यमंत्र्यांची...

कल्याणमध्ये जुन्या इमारतीचा स्लॅब पडून 6 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी; मुख्यमंत्र्यांची आर्थिक मदतीची घोषणा!

चार मजली जुन्या इमारतीचा वरचा स्लॅब कोसळून, सहा जण ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडले, मृतांमध्ये एक चिमुरडी..

पोलीस वार्ता, ठाणे : राज्यात सर्वच ठिकाणी आज मंगळवारी पावसाच्या सरी पडल्या पुणे, मुंबई, नाशिकसह अन्य ठिकाणी दिवसभर पाऊस पाहायला मिळाला त्यातच ठाण्याच्या कल्याण पूर्व येथील चिकणीपाडा मंगलराघो नगर भागात एक इमारत दुर्घटना झाली आहे. आज 20 मे, मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान चार मजली असलेल्या श्री सप्तशृंगी हौसिंग सोसायटीच्या वरच्या मजल्याचे छत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर आणखीन पाच जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
दुर्घटनेचे माहिती मिळताच अग्निशनम दल, महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. बचाव कार्यात प्रथम आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले गेले. पण त्यातील सहा जण मृत्यू झाले होते. मृतांमध्ये दोन पुरुष, तीन महिला, आणि एक दीड वर्षाची मुलगी होती. इतर दोघांना जखमी असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
श्री सप्तशृंगी हौसिंग सोसायटीच्या रहिवासी नागरिकांना मान्सून सुरू होण्यापूर्वीच इमारत खाली करण्यास सांगण्यात सांगितले होते, असे आता महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही इमारत 40 वर्षे जुनी झाली असून धोकादायक स्थितीत नागरिक येथे राहत होते.
  • मृतांची नावे..
1)प्रमिला साहू (58)
2) नामस्वी शेलार (1.5)
3) सुनीता साहू (37)
4) सुजाता पाडी (32)
5) सुशीला गुजर (78)
6) व्यंकट चव्हाण (42)

  • जखमीची नावे..
1) अरुणा रोहिदास गिरणारायन (48)
2) शरवील श्रीकांत शेलार (04)
3) विनायक मनोज पाधी (4.5)
4) यश क्षीरसागर (13)
5) निखिल खरात (27)
6) श्रद्धा साहू (14)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले असून या संदर्भात त्यांनी अधिकृत एक्स हँडलवरून पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तसेच ते म्हणाले कल्याणमध्ये एका इमारतीचे छत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत सहा नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या ठिकाणी बचावकार्य आता पूर्ण झाले असून महापालिका आयुक्त स्वत: घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन त्यावर देखरेख ठेवून आहे. जखमींची प्रकृती सुखरुप आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येतील.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!