Homeक्राईमबोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती

भुसावळ – रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात दोषी ठरलेल्या महेंद्र बारेला याच्या शिक्षेबाबत बुधवारी विशेष जलद न्यायालयात अंतिम युक्तिवाद पार पडला. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी हा गुन्हा “रेअरेस्ट ऑफ रेअर” प्रकारातील असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. न्यायालयाचा अंतिम निकाल गुरुवारी (४ जून) जाहीर होणार आहे.

दुपारी बारा वाजता विशेष न्यायाधीश एस. आर. यादव न्यायालयात स्थानापन्न झाल्यानंतर आरोपीला हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोष सिद्ध झाल्याची माहिती देत जन्मठेप अथवा फाशी अशा शिक्षेच्या पर्यायांची कल्पना दिली. यावेळी आरोपीने आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असून आपण एकमेव कमावता असल्याचे सांगत किमान शिक्षा देण्याची विनंती केली. तसेच भविष्यात अशा गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही, अशी ग्वाहीही दिली.

आरोपीतर्फे अ‍ॅड. सत्यनारायण पाल यांनी युक्तिवाद करत गुन्हा पूर्वनियोजित नसून अचानक घडल्याचा दावा केला. आरोपीचे वय व कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याला कमी शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी तब्बल ४५ मिनिटे प्रभावी युक्तिवाद करत आरोपीच्या कृत्याची क्रूरता अधोरेखित केली. चार निष्पाप बालकांची निर्दयी हत्या, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विश्वासघात आणि समाजमनाला हादरा देणारे स्वरूप या बाबींचा उल्लेख करत त्यांनी कठोरात कठोर शिक्षा देण्याची गरज मांडली.

ॲड. निकम यांनी हा गुन्हा समाजासाठी धोकादायक प्रवृत्तीचे उदाहरण असल्याचे सांगत, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी फाशीची शिक्षा आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ तत्त्वाचा दाखला देत समाजाच्या सामूहिक विवेकाला धक्का बसणाऱ्या गुन्ह्यांत कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

या खटल्यात २८ साक्षीदार तपासण्यात आले असून प्रत्यक्ष साक्षीदार नसतानाही वैज्ञानिक व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यात आला आहे.

या प्रकरणी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांना अ‍ॅड. प्रवीण भोंबे व अ‍ॅड. संभाजी जाधव यांनी सहाय्य केले, तर आरोपीतर्फे अ‍ॅड. सत्यनारायण पाल यांनी बाजू मांडली. न्यायालयात फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, डॉ . विशाल जयस्वाल यांची उपस्थिती होती.

चार निष्पाप भावंडांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला फाशी की जन्मठेप, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
______

चौकट…
युक्तिवादा दरम्यान निकम यांनी प्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांच्या “हॅम्लेट” नाटकातील पात्रांचा संदर्भ देत आरोपीचे कृत्य अत्यंत दुष्ट आणि अमानवी असल्याचे प्रतिपादन केले. अशा व्यक्तीला दया दाखविणे चूक ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

कारागृहातील समुपदेशन, सुधारणा कार्यक्रम आणि वर्तन अहवालांचा उल्लेख करताना निकम म्हणाले की, आरोपीमध्ये पश्चात्तापाची भावना दिसून आलेली नाही. त्यासाठी त्यांनी संस्कृतमधील “मन्त्रेण शाम्यते सर्पः, न खलः शाम्यते कदा” या उक्तीचा दाखला देत, “गारुडी पुंगी वाजवून सापाला शांत करू शकतो; मात्र काही दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये सुधारणा होणे कठीण असते,” असे प्रतिपादन केले.
____

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

भगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप

0
नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले...

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

error: Content is protected !!